ETV Bharat / city

माझं घर आणि शाळेची रेकी सुरू.. नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप, दोन व्यक्तीचे फोटो केले ट्विट - नवाब मलिक लेटेस्ट

आर्यन खान व मुंबई ड्रग्ज प्रकरणावरून नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदा आणि ट्विटरच्या माध्यमातून समीर वानखेडेंवर आरोपांची मालिका सुरू ठेवली आहे. मलिक यांनी आज एक ट्विट करुन खळबळजनक आरोप केलाय. गेल्या काही दिवसांपासून काही लोक माझ्या घराची आणि शाळेची रेकी करत असल्याचा आरोप मलिकांनी केलाय. इतकंच नाही तर दोन व्यक्तींचे फोटोही मलिक यांनी ट्विट केले आहेत.

nawab-malik-alleges
nawab-malik-alleges
author img

By

Published : Nov 26, 2021, 10:16 PM IST

मुंबई – राज्यात ड्रग्ज प्रकरणावरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिकांनी आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करत नोकरी बळकावल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. त्याचबरोबर आर्यन खानचे अपहरण करून खंडणी मागितल्याच्या आरोपांनी खळबळ माजवली. समीर वानखेडे (Sameer Wankhede) कुटुंब मुस्लीम असून स्वत:ला हिंदू असल्याचे दाखवत असल्याचा आरोप मलिकांनी केला. मलिकांच्या या आरोपावर वानखेडे कुटुंबीयांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.

मुंबई ड्रग्स आणि आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणापासून नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि भाजपवर जोरदार टीका आणि आरोपांची मालिका सुरु ठेवलीय.

  • यह लोग इस गाड़ी में सवार पिछले कुछ दिनों से मेरे घर और स्कूल की 'रेकी' कर रहे हैं.
    अगर कोई इन्हें पहचानता हो तो मुझे जानकारी दे.
    जो लोग इस तस्वीर में हैं, मेरा उनसे कहना हैं कि, तुम्हें मेरी कोई जानकारी चाहिए तो आकार मुझसे मिले, मैं सारी जानकारी दे दूँगा pic.twitter.com/ZAmJhqEWoL

    — Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 26, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आज मात्र, मलिक यांनी एक ट्विट करुन खळबळजनक आरोप केलाय. गेल्या काही दिवसांपासून काही लोक माझ्या घराची आणि शाळेची रेकी करत असल्याचा आरोप मलिकांनी केलाय. इतकंच नाही तर दोन व्यक्तींचे फोटोही मलिक यांनी ट्विट केले आहेत.जर कुणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्यावी. जे लोक या फोटोत आहेत त्यांना माझं म्हणणं आहे. जर माझ्याविषयी माहिती हवी तर मला येऊन भेटावं. मी सगळी माहिती देईन असं त्यांनी सांगितले आहे.

नवाब मलिकांची न्यायालयाला हमी -

मुंबई उच्च न्यायालयाच्या एकल न्यायमूर्ती पीठाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मनाई आदेश न काढल्याने ज्ञानदेव वानखेडे यांनी खंडपीठासमोर अपील याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी पार पडली. त्यावेळी ९ डिसेंबरच्या पुढील सुनावणीपर्यंत वानखेडे कुटुंबाविरोधात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणतेही सार्वजनिक विधान करणार नसल्याची हमी नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाला द्यावी लागली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.