ETV Bharat / city

Nawab Malik Allegations on NIA : केंद्रीय यंत्रणा परमबीर सिंग यांना वाचवतेय - नवाब मलिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे ट्वीट

केंद्रीय यंत्रणा परमबीर सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ( Nawab Malik allegation on NIA ) केला. तसेच एनआयएला एक दिवस खरं काय आहे हे सांगावं लागेल. सत्य जास्त दिवस लपून राहणार नाही असेही मलिक म्हणाले.

Nawab Malik Allegations on NIA
नवाब मलिक
author img

By

Published : Dec 14, 2021, 7:36 PM IST

मुंबई - केंद्रसरकार व भाजपसोबत परमबीर सिंग यांचे महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे डील झाले होते. त्यातूनच अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले. आता केंद्रीय यंत्रणा परमबीर सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ( Nawab Malik allegation on NIA ) केला. तसेच एनआयएला एक दिवस खरं काय आहे हे सांगावं लागेल. सत्य जास्त दिवस लपून राहणार नाही असेही मलिक म्हणाले.

'पैसे दिले नाहीत' -

परमबीर सिंग यांने खोटे आरोप आणि राजकीय षडयंत्र करुन अनिल देशमुख यांना फसवले आहे. सरकारला व अनिल देशमुख यांना बदनाम करण्याचा दुरुपयोग केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून झाला असेही नवाब मलिक म्हणाले. या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने चांदीवाल आयोग नेमला असून या आयोगासमोर सचिन वाझे याने अनिल देशमुख यांना पैसे दिले नाही असा जवाब नोंदवला असल्याचे समोर येत आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

'एनआयए वाचवतेय' -

परमबीर सिंग यांनी जिलेटीनचे जे कांड केले. त्यामध्ये एनआयएने परमबीर सिंग यांचा जवाब नोंदविल्यानंतर ते फरार झाले. मात्र एनआयएने चार्जशीटमध्ये जो मास्टरमाईंड आहे तो कोण आहे हे सांगितले पाहिजे. एनआयएने अद्याप त्यावर चार्जशीट का दाखल केली नाही? परमबीर सिंग यांच्या घरात शर्मा आणि वाझे यांची बैठक का झाली? त्यांचं नाव घेतले जाते, ड्रायव्हरचा जवाब सांगितला जातो, इनोव्हा गाडीची चर्चा होते मात्र परमबीर सिंगच्या नावाची चर्चा होत नाही. एनआयए केंद्र सरकारच्या दबावाखाली परमबीर सिंग यांना वाचवतेय हे सत्य आहे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं ( 100 crore recovery case ) टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे (API Sachin Waze) यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे (Sanjeev Palande) आणि खासगी सहायक कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांनाही याच प्रकरणात दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) कोठडीत आहे.

हेही वाचा - Anil Deshmukh's Family Vs ED : मालमत्तेवरील जप्ती उठवा, अनिल देशमुखांच्या कुटुंबीयांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.