मुंबई - नांदेड, मालेगाव आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये शुक्रवारी 12 नोव्हेंबरला बंद पुकारण्यात आला होता. या बंदला काही प्रमाणात हिंसक वळण लागलं. आंदोलनाला ज्या कोणी हिंसक वळण लावलं त्यांच्यावर राज्य सरकार कठोर कारवाई करेल. मात्र शनिवारी 13 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षाकडून जाणून-बुजून दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला आहे. यामागे भारतीय जनता पक्षाचे मोठं षड्यंत्र आहे. भारतीय जनता पक्ष ज्यावेळेस तो बदनाम व्हायला लागतो त्यानंतर ते आपलं शेवटचं हत्यार म्हणून दंगल घडवतो, असा खळबळजनक आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
तसेच अमरावतीमध्ये काही तरुणांना पैसे देऊन भाजप नेते अनिल बोंडे यांनी दंगल घडवून आणली. म्हणून अनिल बोंडे यांना पोलिसांनी अटक केली असल्याचे यावेळी नवाब मलिक यांनी सांगितले आहे.