ETV Bharat / city

Navratri 2022 : गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारी नवदुर्गा 'ज्योत्सना रासम'; दिली मर्दानी चित्रपटासाठी राणी मुखर्जीला तालीम

आजपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु झाला (Navratri festival 2022) आहे. याच नवरात्री उत्सवादरम्यान आपण ईटीव्ही भारतच्या माध्यमातून कर्तृत्ववान आणि जिगरबाज महिलांचा खडतर प्रवास जाणून घेणार आहोत. अशीच एक नवदुर्गा म्हणजे ‘मर्दानी’ चित्रपटासाठी राणी मुखर्जीला तालीम देणाऱ्या जिगरबाज पोलीस अधिकारी ज्योत्स्ना रासम (Navadurga Jyotsana Rasam) आहेत .

police officer Jyotsana Rasam
पोलीस अधिकारी ज्योत्सना रासम
author img

By

Published : Sep 27, 2022, 10:50 AM IST

Updated : Sep 30, 2022, 12:59 PM IST

मुंबई : आजपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु झाला (Navratri festival 2022) आहे. याच नवरात्री उत्सवादरम्यान आपण ईटीव्ही भारतच्या माध्यमातून कर्तृत्ववान आणि जिगरबाज महिलांचा खडतर प्रवास जाणून घेणार (Navratri special) आहोत. युनियन ट्रस्ट ऑफ इंडियाच्या ३२ कोटी रुपयांच्या अफरातफरीच्या गुन्ह्य़ाची उकल, मुद्रांक घोटाळ्यातील तपास, सिने अभिनेत्री रेश्मा ऊर्फ लैला खान हिच्या हत्येचा तपास, २०११ मध्ये हैदराबादहून मुंबईला आलेला १ कोटी ४५ लाख किमतीचे हिरे व सोन्याचा मुद्देमाल आरोपींसह हस्तगत करणं, दुबईच्या रोशन अन्सारीला नाटय़मय अटक करणं, साकीनाका परिसरातील बलात्कार आणि हत्येचा तपास इतकं नव्हे तर ‘मर्दानी’ चित्रपटासाठी राणी मुखर्जीला तालीम देणाऱ्या जिगरबाज पोलीस अधिकारी ज्योत्स्ना रासम (Jyotsana Rasam gave Rani Mukherjee training) आहेत.

भ्रूणहत्येच्या विरोधात रासम यांची धडाकेबाज कामगिरी - भ्रूणहत्येच्या विरोधात ११ दिवसांत १३ राज्यांमध्ये ६५८० किलोमीटर प्रवास चारचाकी वाहनाने करून सर्वात वेगवान महिला (फास्टेस्ट वूमन) म्हणून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असणाऱ्या रासम यांची कामगिरी धडाकेबाज आहे. ३४ वर्षांच्या सेवेनंतर आता त्या सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. दुबईमध्ये आपल्या सावत्र मुलाची हत्या करून भारतात पळून आलेल्या रोशन अन्सारीचा शोध घेण्याची जबाबदारी सीबीआयकडे होती. २००२ साली त्या ‘सीबीआय’मध्ये कार्यरत असलेल्या नीरज कुमार यांच्या नेतृत्वाखाली ज्योत्स्ना रासम यांनी काम करण्यास सुरुवात केली होती. तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता रोशन पूर्ण देशात हवाई मार्गाने फिरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सातत्याने तिचा माग काढत असताना, ती मुंब्य्रात तिच्या आईकडे आल्याची खात्रीलायक माहिती सीबीआयला मिळाली. पथकाने पूर्ण तयारी करून तिथे छापा मारण्याचे ठरवले आणि आरोपीच्या मुसक्या (Navadurga Jyotsana Rasam) आवळल्या.

परिस्थिती जेमतेम पण प्रचंड कौटूंबिक आधार - रासम या ३० वर्षांपूर्वी पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर दाखल झाल्या होत्या. आज डी एन नगर परिसरात सहायक पोलीस आयुक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. इतक्या वर्षांच्या प्रवासात त्यांनी अनेक गुन्ह्यांची उकल यशस्वी केली आहे. वांद्र्यातील गांधीनगर परिसरात राहणाऱ्या ज्योत्स्ना रासम यांचं शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल आणि चेतना महाविद्यालयात झालं आहे. त्यांचे वडील छापखान्यात कामाला होते, तर आई घर सांभाळायची. त्यांचे संपूर्ण शिक्षण आई-वडिलांनी केलं, कधीही आबाळ होऊ दिलं नाही, असं ज्योत्स्ना रासम (Navratri special Navadurga) सांगतात.

एक उत्तम गिर्यारोहक - त्या चांगल्या गिर्यारोहक देखील आहेत. १७ हजार ते १९ हजार फूट उंचीच्या तीन शिखरांवर चढाई करण्याची ही मोहीम होती. सात जणांच्या या मोहिमेत त्या एकट्या स्त्री होत्या. १९९१ मध्ये हनुमान तिब्बा (१९४५० फूट), शितीधर (१७३४० फूट) आणि फ्रेंडशिप (१७१०० फूट) या तीन शिखरांना आमच्या चमूने यशस्वीपणे गवसणी घातली. ‘रासम यांचे कुटुंब मूळचे राजापूरचे, पण जन्मापासून आतापर्यंतचे आयुष्य मुंबईत गेले. पुढे ज्योत्स्ना रासमी सांगतात की, ‘‘वाणिज्य शाखेतून शिक्षण घेत असतानाच पदवीच्या तिसऱ्या वर्षांला असतानाच पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जाहिरात आली होती. घरातून तर पाठिंबा होताच, परीक्षा दिली आणि मी उत्तीर्णही झाले. १९८९ मध्ये नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात असताना तिसऱ्या महिन्यात माझ्या एका बहिणीचा अकाली मृत्यू झाला. पूर्ण कुटुंबच हादरलं. मी घरी आले तेव्हा, अशा अवस्थेत मी काय करावं, हे समजत नव्हतं, पण आईनंच मला मार्ग दाखवला. तिनं मला धीर दिला आणि पुन्हा प्रशिक्षणाला जाण्यास सांगितले.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईतील विमानतळ सुरक्षा विभागात त्या रुजू झाल्या. एक प्रकारे बंदोबस्ताचेच काम तिथे अधिक होते. डिसेंबर ९२ च्या दंगलीपासून ते मार्च ९३ मुंबई बॉम्बस्फोटापर्यंत सर्वत्र गोंधळ माजला असताना विमानतळाची सुरक्षा राखण्याचे काम त्या विभागावर होते. स्फोटाच्या दिवसापासून तर पुढील आठवडाभर विभागातील एकही कर्मचारी घरी गेला नाही. सर्वजण दिवसरात्र बंदोबस्तात गुंतलेले होते. त्यानंतर मुंबईच्या लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती झाली.

‘मर्दानी’ चित्रपटासाठी राणी मुखर्जीला तालीम - ज्योत्स्ना रासम यांचं राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ चित्रपटाचा उल्लेख होणं अतिशय गरजेचं होतं. तेव्हा ज्योत्स्ना या गुन्हे शाखेच्या कक्ष ८ मध्ये कार्यरत होत्या. त्यावेळी राणीला त्यांनी गुन्हेगारी तपासाचे धडे गिरवायला शिवकले. तर त्याचदरम्यान त्यांनी बहुचर्चित लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांचा सापडलेल्या मानवी सांगाड्याप्रकरणी इगतपुरी येथे जाऊन त्यांनी तपासकार्य केले (Jyotsana Rasam gave Rani Mukherjee training) होते.

Last Updated : Sep 30, 2022, 12:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.