हैदराबाद - नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे. या विशेष पर्वावर 'ईटीव्ही भारत'ने 'महाराष्ट्राच्या नवदुर्गा' ही विशेष मालिका सुरू केली आहे. या मालिकेत आपण दररोज विविध क्षेत्रातील नामवंत, कर्तृत्ववान महिलांशी गप्पा करतोय. आज आपण पूर्णब्रम्ह महाराष्ट्रीय रेस्टॉरंटच्या संचालिका जयंती कठाळे यांच्याशी चर्चा केली आहे. जयंती कठाळे यांनी आयटी क्षेत्रातील मोठी नोकरी सोडून पूर्णब्रम्हा महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट सुरू केले. तसेच बंगळुरूत सुरू केलेल्या रेस्टॉरंटचं जाळं आता देश-विदेशात पसरत आहे. चला तर जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास...
प्रश्न 1 - आयटी क्षेत्रातील मोठी नोकरी सोडून तुम्ही पूर्णब्रम्हा महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट सुरू केलं... बंगळुरूत सुरू केलेलं हे रेस्टॉरंटचं जाळं देश-विदेशात पसरलय... आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की, नक्की ही प्रेरणा कुठून मिळाली... जगभरात पूर्णब्रम्हाचे सेंटर उभे करण्याचा विचार कधी केला आणि एक नोकरी सोडून व्यवसायात उतरावास का वाटलं?
उत्तर - ज्यावेळेस माणसाच्या पोटाला भूक लागते. तेव्हा माणूस काहीही करतो. परंतु माझ्यावरील संस्कारामुळे मी पूर्णब्रम्हा सुरु करू शकले. मी कंपनीनिमित्त विविध देशात फिरले. मात्र त्याठिकाणी जेवणाची वाणवा झाली. पैसा आहे पण जेवण मिळत नाही, मग पैसा काय कामाचा. त्यामुळे मी जिद्द बाळगली आणि हा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. त्यानुसार बंगळुरूत पहिले रेस्टॉरंट सुरू केले, त्यानंतर हळूहळू व्यवसाय वाढत गेला.
प्रश्न 2 - एका स्त्रीनं पुढे येऊन इतका मोठा व्यवसाय सुरू करणं सोप्पी गोष्ट नाहीये... तुम्हाला कुटुंबाची साथ कशी मिळाली. की यात काही अडचणी आल्या?
उत्तर - कुटंबाची साथ नाही तर कुटुंब सोबत उभं रहायला लागतं. कुटुंबातील सदस्याने म्हणायला पाहिजे की मी तुझ्या सोबत आहे, तू पुढाकार घे. माझ्या कुटुंबाने मला साथ दिली. मुलींनी कोणतेही काम कमी मानायला नको. मुलगा आणि मुलगी दोन्हीही समान आहे. दोघांनाही मी समान वेतन देते. तसेच ज्याला ध्यास लागला त्याला त्रास होत नाही. माझा मुलगा एकटा घरी रहायचा. त्याला मी वेळ देऊ शकत नव्हते. त्यामुळे एके दिवशी त्याच्याजवळ मनमोकळेपणाने रडले.
प्रश्न 4 - तुम्ही नववारी नेसून जगभर प्रवास करता... महाराष्ट्राची ओळख, संस्कृती जगभरात नेत आहात... अशा फार थोड्या महिला आहे... यावर का सांगाल?
उत्तर - स्कर्टच्या वातावरणातून नववार घालणे यासाठी मानसिक तयारी लागते. ते वातावरण तयार करावं लागतं. माझ्या रेस्टॉरंटमध्ये मुली नववार नेसून काम करतात. मला महाराष्ट्राची प्रग्लभता दाखवायची होती. त्यामधील सादगी अतिशय सुंदर आहे. मी जिथंही जाते तिथं नववारी नेसून जाते. एका आजीनं मला असं म्हटलं की, तू अगदी महालक्ष्मी दिसते. मला लंडनच्या विमानतळावर पाठीवर कौतुकाची थाप मिळाली होती. माझ्या दीरानं यासाठी मला प्रोत्साहन दिले. तो नेहमी माझ्यासोबत उभा राहतो. मला जीन्सपेक्षा नववार जास्त सोयीस्कर वाटतं.
प्रश्न 5 - लॉकडाऊनच्या काळात सर्व ठप्प होतं. पूर्णब्रम्ह रेस्टॉरंट देखील बंद असेल... हा काळ कसा गेला... रेस्टॉरंटमध्या कर्मचाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या?
उत्तर - कोरोनाच्या काळात एकही दिवस रेस्टॉरंट बंद नव्हतं. ज्याठिकाणी स्वीगी, झोमॅटो पोहोचलं नाही, त्याठिकाणी आम्ही पोहोचलो. अत्यावश्य सेवेतील लोकांना आम्ही अन्न पुरवले. परदेशातील आणि परराज्यातील विद्यार्थ्यांना आम्ही मदत केली. कोरोनाच्या काळात आम्ही एकही दिवस सुट्टी घेतली नाही. तेवीस लोकांनी यासाठी सहकार्य केलं. त्यावेळचा चांगला अनुभव आमच्या पाठीशी आहे.
प्रश्न 6 - आपल्याकडील महिला चूल आणि मूल यातचं गुंतलेल्या असतात... आताच्या मुली नोकरी करतात... पण तरी पाहिजे तितका बदल झालेला नाही.. मात्र तुम्ही एक त्यांच्यापुढे आदर्श आहात... महिलांना काय संदेश द्याल?
उत्तर - 'नो वन कॅन स्टॉप अस् टू रीच टू अव्हर डेस्टीनेशन'. ज्याला ध्यास लागला त्याला त्रास होत नाही. मंजिलो की तरफ हमे चलते रहना है आणि ती ताकद आपल्यात असते. ती मनोवृत्ती पाहिजे. अपयश येईल, पण ते देखील पार पडेल. म्हणून महिलांनी ताकदीने उभं राहावं.