ETV Bharat / city

Rana Couple Fly to Delhi : राणा दाम्पत्य दिल्लीला रवाना; आम्ही कोर्टाचा अवमान केला नाही - नवनीत राणा

आम्ही कोर्टाचा अवमान केला नाही. दिल्लीत जाऊन प्रमुख नेत्यांची संवाद साधणार आहोत. पोलीस ठाणे, तुरुंगात आमच्याशी गैरव्यवहार झाला असल्याची प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे.

rana
rana
author img

By

Published : May 9, 2022, 10:46 AM IST

Updated : May 9, 2022, 11:21 AM IST

मुंबई - पोलीस ठाणे, तुरुंगात आमच्याशी गैरव्यवहार झाला आहे. याबाबतची सर्व माहिती दिल्लीत जाऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देणार असल्याची माहिती खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे आज दिल्लाला रवाना झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारविरोधात राणा दाम्पत्य दिल्लीत दरबारी तक्रार करणार आहेत.

मुख्यमंत्री केवळ सुडाचे राजकारण करतात - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ सुडाचे राजकारण करत आहेत. राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलल्यामुळे आपल्याला अपमानास्पद वागून दिली गेली. महिला खासदाराला सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये प्यायला पाणी दिले नाही. साधी सतरंजीही आम्हाला पोलिसांनी दिली नाही. राज्य सरकारकडून पोलिसांचा दुरुपयोग सुरू आहे, अशी टीका आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. तर, आपण केवळ हनुमान चालीसाचे पठण मातोश्रीबाहेर करणार असे म्हटल्यामुळे आमच्या मुंबईतील आणि अमरावतीतील घरावर शिवसेनेच्या गुंडांनी हल्ला केला. आम्हाला 20 फूट गाडण्याचे वक्तव्य केले. मात्र, या विरोधात राज्य सरकार आणि पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले आहे. त्यामुळेच आपण दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांची तक्रार करणार असल्याचे राणा दाम्पत्याने सांगितले आहे.

सकाळी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री आणि राज्य सरकारची तक्रार करण्यासाठी राणा दाम्पत्य दिल्लीसाठी रवाना झाले आहे. तर, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि मंत्री अनिल परब यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांची भेट घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत देखील सांगणार असल्याचे यावेळी राणा दाम्पत्याने सांगितले.

न्यायालयाचा अवमान केला नाही - न्यायालयाने ज्या अटी-शर्तीवर आपल्याला जामीन दिला, त्यापैकी कोणत्याही अटी-शर्तीचे उल्लंघन आपण केले नाही. संविधान आणि न्यायालयावर आपला पूर्ण विश्वास आहे. न्यायालयाचा आम्ही सन्मान करतो. जे आरोप आमच्यावर होते त्याबाबत आम्ही अद्याप एक शब्दही बोललो नसल्याचे स्पष्टीकरण खासदार नवनीत राणा यांनी दिले आहे. तर, न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे आम्ही पालन करत असून, लोकशाही आणि संविधानाने दिलेल्या अधिकारातून आम्ही मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर टीका करत असल्याचे मत आमदार रवी राणा यांनी यावेळी व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांना आमचे घर पाडण्यात रस - आम्ही राहात असलेली खारमधील इमारत जवळपास पंधरा वर्षे जुनी आहे. इमारत बांधताना विकासकांनी सर्व परवानग्या घेतल्या. मात्र, आता मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला त्रास दिला जात आहे. आजही महानगरपालिकेचे अधिकारी आमच्या घराची तपासणी करत आहेत. महानगरपालिकेचे अधिकारी नाही तर, मुख्यमंत्र्यांनी देखील ऑनलाईन पद्धतीने आमच्या घराची पूर्ण तपासणी करून घ्यावी. गरज पडल्यास मंत्री अनिल परब आणि खासदार संजय राऊत यांनाही पाठवावे. कारण मुख्यमंत्र्यांना आमचे घर पाडण्यात रस आहे, असा टोला आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. तसेच राज्याचा कारभार कसा करावा हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिकण्याची गरज असल्याचा चिमटा नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना काढला आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घ्यावी - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल एका कार्यक्रमाच्या माध्यमातून राणा दाम्पत्यांवर टीका केली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्यासोबत झालेल्या सर्व घटनेची माहिती घ्यावी. खार पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला चहा पाजण्यात आला. मात्र, ज्या वेळेस आम्हाला सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले, त्यावेळी रात्री साडेबारानंतर पोलिसांनी आमच्याशी गैरव्यवहार केला. आम्हाला पाणीही दिले नाही. याबाबतची पूर्ण माहिती अजित पवार यांनी घ्यावी, अशी विनंती राणा दाम्पत्यांनी केली आहे.

Last Updated : May 9, 2022, 11:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.