नवी मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा गेले कित्येक वर्षांपासून गाजत आहे. त्यामुळे परस्परविरोधी भूमिकाही तयार होत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव द्यावे, अशी मागणी केली होती. त्याच प्रमाणे आता आरपीआय पक्षाच्या माध्यमातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'बुद्ध भूमी' हे नावं द्यावे अशी मागणी पुढे येत आहे.
विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे-
नवी मुंबई व पनवेल परिसरातील लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे. ज्यांची जमीन या प्रकल्पासाठी घेतली गेली आहे, त्यांची ही लोकभावना आहे. मात्र या विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे यावर शिवसेनाही अडली आहे. आता या नावाच्या वादात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही पडली असून, या विमानतळाला 'बुद्ध भूमी', नाव द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा- चर्चा तर होणारच! ग्रामपंचायत निवडणूक निकालातील लक्षवेधी घडामोडी