मुंबई - भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोशल मीडियावर खोटा व्हिडिओ शेअर करून आपली तसेच काँग्रेस पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांना कायदेशीर धडा शिकवणार असल्याचा इशारा देत काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नसीम खान यांनी पात्रांविरोधात साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
![complaint against sambit patra](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-01-nasimkhan-sabitpatra-7201153_07022020181343_0702f_1581079423_894.jpg)
हेही वाचा - लातुरात १८ वर्षीय तरुणीला रॉकेल टाकून पेटविले?
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात. एका जुन्या व्हिडिओची कसलीही शहानिशा न करता संबित पात्रांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर शेअर करून काँग्रेस व आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजात तेढ निर्माण होऊन त्याचा फायदा व्हावा, हा त्यांचा कुटील हेतू यामागे असल्याचे स्पष्ट दिसते. तसेच हा व्हिडिओ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान आरएसएसच्या एका स्वयंसेवकाने सोशल मीडियावर प्रसारित करून आपली व काँग्रेसची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करून संबंधित व्यक्तीवर कारवाईही करण्यात आली होती. तसेच सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेला तो व्हिडिओ खोटा असून मूळ व्हिडिओची मोडतोड करण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले होते. असे असतानाही मानसिक विकृत्तीतून पुन्हा भाजपने हा खोटा व्हिडिओ प्रसारित केला असल्याने आपण त्यांना कायदेशीर धडा शिकवणार असून त्यासाठीच आज पोलिसांमध्ये पात्रांविरोधात तक्रार दिली असल्याची माहिती नसीम खान यांनी दिली.