ETV Bharat / city

सरकारमधील प्रत्येक खात्याचा भ्रष्टाचार मी पुराव्यानिशी समोर आणेल; नारायण राणेंचा इशारा - नारायण राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार चालला असून, तो आपण उघड करणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

Narayan Rane
नारायण राणे
author img

By

Published : May 26, 2021, 5:30 PM IST

मुंबई - कोकणाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी काय केलं? मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात पॅकेज का जाहीर केले नाही? असे प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केले आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर त्यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा नुसता फेरफटका आणि नौटंकी दौरा असल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारच्या प्रत्येक खात्यांमध्ये सध्या भ्रष्टाचार सुरू असून तो पुराव्यानिशी समोर आणण्याचा इशाराही यावेळेस नारायण राणे यांनी दिला आहे.

हेही वाचा -"...अरेस्ट तो उनका बाप भी नही कर सकता', बाबा रामदेव यांचा व्हिडिओ व्हायरल

मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका -

मुख्यमंत्र्यांनी कोकणचा दौरा केला पण त्यासाठी किती वेळ दिला असा सवाल नारायण राणे यांनी केला. नारायण राणे म्हणाले की, केवळ तीन तासांच्या दौर्‍यात मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली, पण या वादळात किती लोकांचे नुकसान झाले? किती जणांचे रोजगार गेले? याची माहिती लोकांकडून घेतले नाही. मुख्यमंत्र्यांनी लोकांची भेट का घेतली नाही? असा सवाल खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात पॅकेज का जाहीर केले नाही? असा सवालही नारायण राणे यांनी केलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनामध्ये स्पष्टता नाही. नारायण राणे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी कोकणाला काय दिलं? एक तरी प्रकल्प दिला का? पर्यटनासाठी काय दिलं? किती विकास केला आहे हे सांगावं भावनिक विषयांवर गोडगोड बोलून कोकणाची फसवणूक ठाकरे सरकारकडून केली जात आहे. असा घणाघाती आरोप भाजप नेते नारायण राणे यांनी केला.

सरकारमधील भ्रष्टाचार बाहेर काढेल -

महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार चालला असून, तो आपण उघड करणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. मंत्रालयात केवळ टक्केवारीसाठी काम चालत आहे. कोरोनाच्या औषधांच्या टेंडरमध्ये पैसे खाल्ले जात आहेत, याबद्दल संजय राऊत यांनी जाहीर करावे अन्यथा मी जाहीर करेल. पोलीस वसाहतींच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाला असून, प्रत्येक खात्यात चाललेला भ्रष्टाचार मी नावानिशी आणि पुराव्यानिशी येत्या काही दिवसातच उघड करेल, असा इशाराही खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

हेही वाचा - '15 दिवसात माफी मागा,नाहीतर...' आएमएकडून रामदेव बाबांना एक हजार कोटींची नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.