मुंबई : सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर टीका केली नसून त्यांच्या क्षमतेचे कौतुक करण्यात आल्याचे स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. नाना पटोलेंच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले होते.
ही टीका नाही, हे तर कौतुक
काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद पाच वर्षांसाठी देण्यात आले आहे. फक्त एका वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही, अशा शब्दांत ‘सामना’च्या अग्रलेखातून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आलं आहे. मात्र नाना पटोलेंवर ही टीका नसून त्यांच्या क्षमतेचे कौतुक असल्याचे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे.
सामनातून नाना पटोलेंवर टीका केली नसून त्यांच्या क्षमतेचे कौतुक, संजय राऊत यांचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री नाराज?नाना पाटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती. अशी काही नाराजी आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर बोलताना राऊत यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या घटनात्मक पदाच्या निवडणुका वारंवार येऊ नये, असं आम्ही सामनात म्हटलं आहे. पाच वर्षांसाठी अध्यक्षपद असतं. त्यामुळे अध्यक्षपदावरील व्यक्तीनं राजीनामा दिल्यानं पुन्हा निवडणूक होते. महाविकास आघाडीचं सरकार आहे. तीन पक्षांचं बहुमत आहे. तरी या गोष्टी टाळायला हव्यात,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.चक्का जाम आंदोलनाला आमचा पाठिंबाआमचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे. आजही मी स्वतः गाझीपूर सीमेवर आंदोलन करणार्या शेतकरी नेत्यांशी संपर्क साधणार आहे. तसेच चक्का जाम आंदोलन करणार्या शेतकर्यांना आमचा पाठिंबा आहे. हा राजकीय कार्यक्रम नसून आम्ही एकत्र आहोत असेही राऊत यांनी म्हटले आहे.