ETV Bharat / city

नाना पटोले होणार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष? प्रणिती शिंदे कार्याध्यक्ष? - congress state president

गेल्या काही दिवसांपासून राज्य काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे वाहत आहेत. यासाठी महाराष्टातून अनेक नावांचा विचार केला गेला असला तरी, दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे.

नाना पटोले होणार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष? प्रणिती शिंदे कार्याध्यक्ष?

author img

By

Published : Feb 3, 2021, 11:12 AM IST

मुंबई : काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत मोठे बदल होण्याची शक्यता असून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविली जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याशिवाय राज्यात चार ते पाच कार्याध्यक्षांची निवड केली जाण्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

प्रणिती शिंदे कार्याध्यक्ष पदी?

गेल्या काही दिवसांपासून राज्य काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे वाहत आहेत. यासाठी महाराष्टातून अनेक नावांचा विचार केला गेला असला तरी, दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. नाना पटोले यासाठी दिल्लीत रवाना झाले असून त्यांच्या सोबत काँग्रेस मध्ये चार ते पाच कार्यध्यक्षदेखील निवडले जाणार आहेत. कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र असे विभागनिहाय कार्यध्यक्ष निवडले जाणार आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार्याध्यक्ष पदासाठी प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, वसंत पुरके आणि हुसेन दलवाई यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तीन दिवसांपूर्वीही काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी दिल्लीत या संदर्भात बैठक बोलाविली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेचे प्रदेशाध्यक्षपद बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपविण्यात आले होते. त्यावेळीही अशाच प्रकारे कार्याध्यक्ष निवडले गेले होते. त्याचा चांगला फायदा निवडणुकीत काँग्रेसला झाला.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत करावी लागणार चर्चा
नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवले गेले तर, विधानसभा अध्यक्ष पद रिकामे होणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या पूर्वनिवडी संदर्भात काँग्रेसला दोन्हीही पक्षांना कळवावे लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष फेरनिवडीच्या प्रक्रियेला महाविकास आघाडी म्हणून तीनही पक्षांना सामोरे जावे लागणार आहे. मात्र अद्याप या संदर्भात काँग्रेच्या पक्षश्रेष्ठींनी दोन्ही पक्षांशी चर्चा केली नसल्याची माहिती मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.