ETV Bharat / city

Nana Patole on Nawab Malik Arrest : 'काँग्रेस पक्ष मंत्री नवाब मलिक यांच्या पाठीशी; केंद्राने महाराष्ट्राची बदनामी थांबवावी'

नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईचे आश्चर्य (ED Arrested Nawab Malik ) वाटत नाही. कारण केंद्र सरकारच्या विरोधात जो कोणी बोलतो त्याच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. यापूर्वीही विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांवर अशीच कारवाई केलेली आहे, असे नाना पटोले ( Nana Patole on Nawab Malik Arrest ) यांनी म्हटले आहे.

Nana Patole
Nana Patole
author img

By

Published : Feb 23, 2022, 5:50 PM IST

मुंबई - राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (ED Arrested Nawab Malik ) यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) कारवाई ही सुडबुद्धीने केलेली आहे. नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत होते. केंद्र सरकारविरोधात आवाज उठवल्यानेच ईडीच्या माध्यमातून कारवाई केली असून आम्ही नवाब मलिक यांच्या पाठीशी आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole on Nawab Malik Arrest ) यांनी म्हटले आहे.

केलेल्या कारवाईचे आश्चर्य वाटत नाही
ईडीच्या कारवाईसंदर्भात प्रतिक्रिया देताना नाना पटोले पुढे म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईचे आश्चर्य वाटत नाही. कारण केंद्र सरकारच्या विरोधात जो कोणी बोलतो त्याच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. यापूर्वीही विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांवर अशीच कारवाई केलेली आहे. भाजपाचा हा नवा धंदा आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. केंद्रात सत्ता असल्याचा माज भाजपाला असून अशा कारवायांविरोधात आता चर्चा करून आम्ही सामुहिकरित्या लढा देणार आहेत. महाराष्ट्राची बदनामी करुन सत्ता मिळवण्यासाठी हे सर्व चालले असून जनता हे पहात आहे, असेही नाना म्हणाले.

हेही वाचा - Nawab Malik Arrested : नवाब मलिकांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कनेक्शन? 'या' प्रकरणात झाली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.