मुंबई - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत पटोले यांचेही नाव असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. पटोले यांनी आपला राजीनामा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे सुपूर्द केला.
हेही वाचा - प्रियांका गांधींनी घेतली नवरीत सिंह यांच्या कुटुंबीयांची भेट; म्हणाल्या त्यांचे हौतात्म्य वाया जाणार नाही..
एक व्यक्ती, एक पद -
काँग्रेसने मुंबई अध्यक्ष पदावरुन एकनाथ गायकवाड यांना दूर करून आमदार भाई जगताप यांच्याकडे ही धुरा सोपवल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदही बदलाचे वारे काँग्रेसमध्ये जोरात वाहू लागले होते. आपले पद जाऊ नये यासाठी विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत आपली लॉबिंग सुरू केले. त्यामुळे थोरातच कायम राहतील, कशी काँग्रेसमध्ये चर्चा होती. मात्र, एक व्यक्ती- एक पद या तत्वामुळे काँग्रेसने थोरात यांचा राजीनामा घ्यायचे निश्चित केले आहे.
हेही वाचा - 'माझी वाट लागली तरी चालेल पण समोरच्याची वाट लावल्याशिवाय गप्प बसणार नाही'
यासाठी दिला राजीनामा -
या स्पर्धेत आतापर्यंत विजय वडेट्टीवार, नितीन राऊत या मंत्र्यांची नावे चर्चेत होती. मात्र प्रदेशाध्यक्षपद आणि मंत्रीपदही ठेवून आपण काम करू, अशी अट घातल्यामुळे त्यांच्या नावाचा विचार करण्यात आला नाही. तर पटोले यांनी स्वतःहून प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा व्यक्त केल्याने त्यांचे नाव व येत्या आठवडाभरात शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे. यासाठी पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे.
पटोले यांची प्रतिक्रिया -
राजीनामा दिल्यावर याची माहिती मी सर्व घटक पक्षांना दिली आहे. अधिवेशनात नव्या अध्यक्षांची निवड होईल. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात गेल्या वर्षभरात मला जे सहकार्य दिले त्याबद्दल मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.