ETV Bharat / city

Nana Patole Criticized Kirit Somaiya : नारायण राणे, कृपाशंकर सिंहांवरील सोमैयांच्या आरोपांचे काय झाले?; नाना पटोलेंचा सवाल - नाना पटोले किरीट सोमैया आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) यांच्यावरही किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते, आता ते भाजपात गेले तर मग ते पवित्र झाले का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

nana patole
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
author img

By

Published : Mar 23, 2022, 7:24 PM IST

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) यांच्यावरही किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते, आता ते भाजपात गेले तर मग ते पवित्र झाले का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर नाना पटोले बोलत होते.

करणे व लोकांची बदनामी करणे हा किरीट सोमैयांचा धंदा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, किरीट सोमैया यांनी नारायण राणे व कृपाशंकर सिंह यांच्यावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांचे पुढे काय झाले? ज्यांच्यावर आरोप केले जातात ते भाजपात गेले की पवित्र होतात का? असा प्रश्न विचारत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी धुडकावून लावली. किरीट सोमैया यांनी आतापर्यंत केलेल्या आरोपातील किती आरोप सिद्ध झाले?असा प्रश्न उपस्थित करून आरोप करणे व लोकांची बदनामी करणे हा किरीट सोमैयांचा धंदा असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाचा डाव : देशात महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ, शेतकरी, कामगार या महत्वाच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून असे बेछूट आरोप करण्यात येत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला आहे. भाजपचा हा आरोपांचा खेळ लोकांच्या लक्षात आला आहे. दररोज महाविकास आघाडींच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून महाराष्ट्र भ्रष्टाचारी राज्य असल्याचे प्रतिमा करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचेही नाना पटोले म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.