ETV Bharat / city

बहुमताच्या सरकारने पंडितांना न्याय दिला का?; नाना पटोलेंनी भाजपला सुनावले - द काश्मिर फाईल्स सिनेमा कर मुक्त मागणी

'द काश्मिर फाईल्स' सिनेमाला (The Kashmir Files) कर सवलत द्यावी, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. महाराष्ट्रातही कर सवलतीसाठी भाजपकडून मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु, सवलत मागणाऱ्या केंद्रातील बहुमताच्या सरकारने पंडितांना न्याय दिला का? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपला विचारला.

Nana Patole
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
author img

By

Published : Mar 14, 2022, 8:16 PM IST

मुंबई - काश्मिरी पंडितांवर आलेल्या सिनेमाला (The Kashmir Files) करमुक्त करावे, या मागणीसाठी भाजपने जोर लावला आहे. परंतु, सवलत मागणाऱ्या केंद्रातील बहुमताच्या सरकारने पंडितांना न्याय दिला का? अशा शब्दांत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपला खडेबोल सुनावले. विधानभवनात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

नुकताच प्रदर्शित झालेल्या 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाला कर सवलत द्यावी, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. महाराष्ट्रातही कर सवलतीसाठी भाजपकडून मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र, सिनेमात असे काय आहे. जेणेकरुन भाजपकडून कर सवलत मागितली जात आहे. मुळात सत्तेत येण्यापूर्वी जम्मू - काश्मिर हिंदुसाठी अनेक घोषणा केल्या. परंतु, सत्तेवर आल्यानंतर त्यांना वचनांचा विसर पडला आहे. आता अपयश झाकण्यासाठी कर सवलतीचा मुद्दा पुढे केला जात आहे. काश्मिरी पंडितांचे आजही अनेक मागण्या प्रलंबित आहेत. बहुमतातील सरकार मात्र न्याय देण्यास असमर्थ ठरला आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही-

बदली गैरव्यवहार प्रकरणाची गुप्त माहिती उघड केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सायबर पोलिसांनी रविवारी घरी जाऊन जबाब नोंदवला. सुडापोटी ही कारवाई केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी, फडणवीसांचे यावरुन कान टोचले. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. पोलिसांनी केवळ जबाब नोंदवला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण त्यांनी तापवू नये, पोलिसांना सहकार्य करावे, असे पटोले म्हणाले. तसेच महाविकास आघाडी सरकारने कधीच सुडाने कारवाई केलेले नाही. मात्र ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणाकडून सरकारवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

निधी वाटपावरुन नाराजी-

राज्य सरकारमधील घटक पक्षांमध्ये विकास निधी वाटपावरुन जुंपली आहे. एकमेकांवर कुडघोडीचे प्रकार वाढले आहेत, याबाबत पटोले यांना प्रसारमाध्यमांनी छेडले असता, नाराजी असल्याचे कबूल केले. परंतु, आम्ही सत्तेत असून एकत्र बसून सगळे मतभेद मिटवू, असेही पटोले म्हणाले.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.