ETV Bharat / city

नाना पटोले यांनी स्वीकारला काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार - काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदी नाना पटोले

नाना पटोले यांनी आज काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली आहेत. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील हे उपस्थित होते.

Nana Patole accepted the post of Congress State President
नाना पटोले यांनी स्वीकारला काँग्रेस अध्यपदाचा पदभार
author img

By

Published : Feb 12, 2021, 2:26 PM IST

Updated : Feb 12, 2021, 3:11 PM IST

मुंबई - नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदाची सूत्रे आज(12 फेब्रुवारी) हातात घेतली आहेत. विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर पटोले यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. काल मुंबईत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत काँग्रेसच्या उभारणीसाठी काम करणार असल्याचे सांगितले होते.

नाना पटोले यांनी स्वीकारला काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार

आज नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदाची सूत्रे अधिकृतरित्या हातात घेतली. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील हे उपस्थित होते.

नाना पटोले यांनी 4 फेब्रुवारीला आपल्या विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे सोपवला होता. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने याबाबत अधिकृत घोषणा केली होती.

कोण आहेत नाना पटोले -

नाना पटोले विदर्भातील एक बहुजन समाजाचे आक्रमक नेते असून, १९९९ पासून काँग्रेस पक्षाच्या सलोली मतदारसंघाचे सातत्याने ते प्रतिनिधित्व करतात. २००८ साली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर काँग्रेसच्या वरिष्ट नेत्यांशी वाद झाल्याने त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून ते आमदार झाले आणि २०१४ ला भाजपच्याच तिकिटावर लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले होते. पण पंतप्रधान मोदी यांच्या शेतकऱ्यांविरोधी भूमिकेमुळे नाराज होऊन भाजपला सोडचिठ्ठी देऊन मोदींशी दोन हात करणारे पहिले पक्षातून बाहेर पडणारे नेते ठरले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आले. याच वेळी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानं भाजपशी दोन हात करणारे पहिले नेते ठरल्याने नाना पटोले यांच्या गळ्यात विधानसभा अध्यक्ष पदाची माळ काँग्रेसने घातली.

नाना पटोले यांचे व्यक्तिमत्व आक्रमक

नाना पटोले यांचे व्यक्तिमत्व आक्रमक असल्याकारणाने महाराष्ट्रात सामान्य माणसापासून दुरावलेली काँग्रेस पुन्हा एकदा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचवण्याचे काम नाना पटोले करू शकतील, असा विश्वास दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांना आहे. सध्या काँग्रेसमध्ये पाहिले तर नाना पटोले शिवाय इतर आक्रमक नेतृत्व नाही. यामुळे नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा दिली गेली आहे.

Last Updated : Feb 12, 2021, 3:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.