ETV Bharat / city

एनसीबीला तंबाखू आणि गांजामधील फरक कळतो का? नबाब मलिकांचा सवाल - नवाब मलिकांची समीर वानखेडेंवर टीका

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर गंभीर आरोप केले आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर त्यांचे जावई समीर खान यांना फसवल्याचे म्हटले आहे.

Nawab Malik
Nawab Malik
author img

By

Published : Oct 14, 2021, 11:43 AM IST

Updated : Oct 14, 2021, 3:59 PM IST

मुंबई - नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर गंभीर आरोप लावत आहेत. एनसीबीने क्रूझवर केलेल्या कारवाईवरून त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आम्ही एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपास्थित केले. आज पुन्हा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर त्यांचे जावई समीर खान यांना फसवल्याचा आरोप केला आहे. तसेच एनडीपीएस न्यायालयाच्या निर्णयावरून एनसीबीला तंबाखू आणि गांजा यातला फरक कळतो का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

'माझ्या परिवाराला सहन करावा लागला मानसिक त्रास' -

१३ जानेवारी २०२१ रोजी समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे २०० किलो ड्रग्ज सापडल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले होते. एनसीबीच्या कारवाईचे फोटो आणि प्रेस रिलीज समीर वानखेडे यांच्या नंबरवरूनच पाठवण्यात आले होते. मात्र, न्यायालयाची ऑर्डर आल्यानंतर त्यामध्ये २०० किलो गांजा सापडलाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. एनडीपीएस न्यायालयाने समीर खान यांनी जामीन दिला. त्यांना साडेआठ महिने जेलमध्ये राहावे लागले. काल यासंदर्भातला निकाल आला आहे. यामध्ये गांजा सापडला नसल्याचे म्हटले आहे. मात्र, यामुळे माझ्या परिवाराला मोठा मानसिक त्रास झाला. माझी मुलगी मानसिक धक्क्यात होती. त्यांच्या दोन मुलांवरही परिणाम झाला, असेही ते म्हणाले.

'एका नंबरवरून एनसीबीकडून माहिती पुरवली गेली' -

समीर खान यांच्या संदर्भात एनसीबीने केलेली अटक तसेच एनसीबी ने टाकलेल्या या धाडीदरम्यान त्यांच्याकडून सांगण्यात आलेली माहिती तसेच फोटो एका नंबरवरून सर्व प्रसार माध्यमाला पुरवले असल्याचा आरोपही यावेळी नवाब मलिक यांनी केला. तसेच त्यात वेळी देशात काही ठिकाणी एनसीबीकडून धाडी टाकण्यात आल्या. याबाबतदेखील माहिती या नंबरवरून पुरवण्यात आली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

नवाब मलिक यांच्या सुरक्षेत वाढ -

एनसीबी विरोधात आपण पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या कारवाईंची पोलखोल करत आहोत. या पत्रकार परिषदानंतर देशभरातून माझ्या कार्यालयात फोन येत आहे. या फोनवरून मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. याबाबत गृहमंत्रालयात तक्रार करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. मात्र धमक्यांच्या कॉल संदर्भात गृह खात्याला माहिती मिळताचं, नवाब मलिक यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली असून आता त्यांना Y प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली जात आहे.

हेही वाचा - भागधारकांची दिवाळी : मुंबई शेअर बाजाराचा नवा विक्रम; सेन्सेक्स 61 हजार पार

Last Updated : Oct 14, 2021, 3:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.