ETV Bharat / city

Municipal Officer Beaten : मुंबईत मालमत्ता कर वसूलीवेळी महापालिका अधिकाऱ्याला मारहाण

मालमत्ता कर वसूली दरम्यान महापालिकेच्या पथकावर हल्ला करुन त्यांना मारहाण करण्यात ( Municipal Officer Beaten ) आली. यात अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या डोळ्याजवळ मार लागल्याने ते जखमी झाले. या प्रकरणी महापालिकेकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकास अटक केली आहे.

author img

By

Published : Mar 24, 2022, 3:43 PM IST

मुंबई
मुंबई

मुंबई - मालमत्ता कर वसूली दरम्यान महापालिका अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला ( Municipal Officer Beaten ) आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे. पालिकेच्या फोर्ट कुलाबा ए विभागातील अधीक्षक दशरथ घरवाडे हे मालमत्ता कर वसूली करण्यास गेले असता आश्विनकुमार शाह यांच्याकडून मारहाण करण्यात आली आहे.

ए विभागातील एक अधीक्षक, दोन उपअधीक्षक, तीन निरिक्षक आणि शिपाई हे मालमत्ता कर थकबाकी असल्याने कलम 202, 203, 204 अन्वये जप्ती अटकावणी कारवाईसाठी फोर्ट परिसरात गेले होते. त्यावेळी मालमत्ता धारकाकडून पथकावर हल्ला करण्यात आला. त्यात अधीक्षक दशरथ घरवाडे ( वय 58 वर्षे ) यांच्या उजव्या डोळ्याजवळ मार लागला आहे. या प्रकरणी महापालिकेकडून माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणाऱ्या तिघांपैकी एकास पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई महापालिकेला जकात करातून सर्वाधिक महसूल मिळत होता. मात्र, केंद्र सरकारने देशभरात जीएसटी कर लागू केल्याने जकात कर रद्द झाला. जकात कर रद्द झाल्याने त्या माध्यमातून पालिकेला मिळणारा महसूल बंद झाला. त्याबदल्यात सरकारकडून जीएसटीचा परतावा मिळू लागला. मात्र, हा परतावा कधीही बंद होऊ शकतो. यासाठी पालिकेने उत्पन्न वाढीसाठी नवे स्रोत शोधण्यास सुरुवात केली. त्यानुसार मालमत्ता कर वसुलीवर पालिकेने भर दिला आहे. 2021-22 या मालमत्ता कर वसुलीचे 6 हजार कोटींचे ध्येय असून आतापर्यंत 4 हजार 600 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहे. तर मार्च अखेरपर्यंत 6 हजार कोटींचे ध्येय पूर्ण होईल, असा विश्वास पालिकेच्या कर संकलन निर्धारण विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला.

हेही वाचा - Terror threat to IPL matches: आयपीएलच्या सामन्यांवर दहशतवाद्यांचे सावट; एटीएसच्या अटकेत असलेल्या दहशतवाद्याची कबुली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.