ETV Bharat / city

कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून दसरा मेळाव्याला परवानगी द्यावी, किशोरी पेडणेकर यांचे आवाहन - कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून परवानगी द्या

कायदा सुव्यवस्था बिघडू नये असे वाटतं असेल तर पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी (allow Dussehra Melava at Shivaji Park) शिवाजी पार्क वरील मेळाव्याला परवानगी द्यावी. मुंबईच्या माजी महापौर व शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी असे आवाहन केले आहे (appeals Kishori Pednekar).

किशोरी पेडणेकर यांचे आवाहन
किशोरी पेडणेकर यांचे आवाहन
author img

By

Published : Sep 20, 2022, 3:18 PM IST

Updated : Sep 20, 2022, 4:26 PM IST

मुंबई - दसरा मेळावा आणि शिवसेना याचे अतूट नाते आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानातच होणार आहे. पालिकेकडे रीतसर परवानगी मागितली आहे. पालिका आम्हाला परवानगी देईल अशी अपेक्षा आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये असे वाटतं असेल तर पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी शिवाजी पार्क वरील मेळाव्याला परवानगी द्यावी (allow Dussehra Melava at Shivaji Park), असे आवाहन मुंबईच्या माजी महापौर व शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. तसेच नारायण राणे यांनी कोर्टाचा निकाल खिलाडू वृत्तीने घ्यावा असे आवाहन करत कोर्ट मॅटरमध्ये कोणीही दबाव टाकतील असे वाटत नसल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे (appeals Kishori Pednekar).

कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून परवानगी द्या - शिवसेनेची भूमिका पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ठरवतात. त्यांनी दसरा मेळावा शिव तीर्थावर होणार हे आधीच स्पष्ट केले आहे. एक नेता, एक पक्ष, एक झेंडा, एक मैदान हे समीकरण आहे. हे समीकरण आता बदलण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोंडी केली जात आहे. पण मला खात्री आहे परवानगी मिळेल. परवानगी नाकारताना त्यांना कारणे द्यावी लागतील. परवानगी नाकारली तर हे महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता बघते आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये या मताचे आम्ही आहोत. मात्र जुनी शिवसेना कुठे आहे हे बघायची अनेकांना खुमखुमी आहे. ती खुमखुमी शिवसैनिक दाखवतील. कायदा सुव्यवस्था बिघडू नये असे वाटतं असेल तर पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी शिवाजी पार्कवरील मेळाव्याला परवानगी द्यावी असे आवाहन पेडणेकर यांनी केले आहे.

आम्ही शपथेला बांधील - ५६ वर्ष शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा होत आहे. त्यामधील २ वर्षे कोव्हीडची आणि दोनवेळा पाऊस पडला म्हणून दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला नव्हता. इतरवर्षी सतत मेळवा शिवाजी पार्क मैदानात झाला आहे. २०१२ ला बाळासाहेब ठाकरे आजारी होते. तरीही त्यांनी शिवसैनिकांना संबोधित केले आहे. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सांभाळा अशी शपथ दिली होती. त्या शपथेला आम्ही बांधील आहोत, असेही पेडणेकर म्हणाल्या. तळागाळातील शिवसैनिक शिवसनेच्या सोबत आहेत.

कोर्टाच्या मॅटरमध्ये कोण दबाव टाकतील - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्यातील बेकायदेशीर बांधकाम तोडावे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यावर बोलताना, देश संविधान आणि कायदा कानुनवर चालतो. आमचं संविधानावर प्रेम आहे आणि कायदा मानणारी आम्ही लोक आहोत. ते केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री होते. ते लढाऊ वृत्तीचे आहेत, ते इतक्या मोठ्या पदावर गेले आहेत, त्यांच्यामधील समंजसपणा दिसत असल्याने ते हा निर्णय खिलाडू वृत्तीने घेतील अशी अपेक्षा आहे. कोर्टाने आदेश दिल्यावर पालिका कार्यवाही करते. प्रशासक असल्याने कोणाचा त्यांच्यावर दबाव नसणार. कोर्टाच्या मॅटरमध्ये कोण दबाव टाकतील असे वाटतं नाही अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे म्हणवणारे मुख्यमंत्री एकनाथन शिंदे कायदा मानणारे असतील असे मला वाटते असा टोलाही पेडणेकर यांनी लगावला.

Last Updated : Sep 20, 2022, 4:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.