मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरामध्ये कोरोना विषाणूचे 171 हून अधिक रुग्ण आढळल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झालेला आहे. अशातच मुंबईतल्या गजबजलेल्या वरळी कोळीवाडा परिसरात कोरोना ग्रस्त असलेले दहा रुग्ण मिळाल्यामुळे हा संपूर्ण परिसर पोलिसांनी सील केलेला आहे. याठिकाणी नागरिकांना घराबाहेर येण्यास मज्जाव करण्यात आलेला असून जवळपास 32000 घर असलेल्या वरळी कोळीवाड्यात 80 हजार लोकसंख्या दाटीवाटीने राहत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या ठिकाणी आता खबरदारीचा उपाय म्हणून हा परिसर सील केला आहे. वरळी कोळीवाडा येथून या गोष्टीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.
80 हजार लोकसंख्या असलेला वरळी कोळीवाडा सील - news about worli koliwada
मुंबई पोलिसांनी वरळी कोळीवाड परिसर सील केला आहे. या भागात कोरोना आजाराचा रुग्ण आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.