ETV Bharat / city

मुंबईचे दुकानदार सम आणि विषम मध्ये फसले? कोण कधी दुकान सुरू ठेवणार यावरून वाद..

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा आलेख खाली येताना दिसत आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे मुंबईत निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. मुंबईमध्ये सकाळी 7 ते दुपारी दोन या वेळेत सर्व भागात दुकाने सुरू राहणार आहेत. दुकाने सुरू करण्यासाठी सम आणि विषम फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे.

mumbai unlock situation
mumbai unlock situation
author img

By

Published : Jun 2, 2021, 3:34 PM IST

Updated : Jun 2, 2021, 3:47 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा आलेख खाली येताना दिसत आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे मुंबईत निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत. मुंबईमध्ये सकाळी 7 ते दुपारी दोन या वेळेत सर्व भागात दुकाने सुरू राहणार आहेत. दुकाने सुरू करण्यासाठी सम आणि विषम फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे. रस्त्याच्या एका बाजुची दुकाने सोमवार, बुधवार, गुरुवार तर दुसर्‍या बाजुची दुकाने मंगळवार आणि गुरुवार अशी सुरू राहणार आहेत. तर शनिवार आणि रविवार आवश्यकतेनुसार दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलेला आहे. परंतु या निर्णयावर व्यापाऱ्यांनी आपली नाराजी दर्शवली आहे.

मुंबईचे दुकानदार सम आणि विषम मध्ये फसले?
आवश्यकतेनुसार दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत खुली राहतील. पहिल्या आठवड्यात रस्त्याच्या उजव्या बाजूकडील दुकाने सोमवार, बुधवार व शुक्रवारी सुरू राहतील. तर रस्त्याच्या डाव्या बाजूकडील दुकाने मंगळवार व गुरुवारी सुरू राहतील. पुढील आठवड्यात रस्त्याच्या डाव्या बाजूकडील दुकाने सोमवार, बुधवार व शुक्रवारी सुरू राहतील. मंगळवारपासून संपूर्ण मुंबईमध्ये दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय झाल्यामुळे व्यावसायिक थोड्या प्रमाणात खूश असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु डाव्या आणि उजव्या फॉर्म्युल्याळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे. कारण डावा आणि उजवा यामधला फरक सध्या व्यापाऱ्यांना कळत नसल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज चेंबूर स्टेशन परिसरातील दुकानांमध्ये तुरळक प्रमाणात लोकांची गर्दी होती. सकाळी रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने सुरू होती. सकाळी तुरळक प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे थोड्या प्रमाणात बाजारात गर्दीही पाहायला मिळाली आहे.

Last Updated : Jun 2, 2021, 3:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.