ETV Bharat / city

Mumbai Passport Verification : मुंबईकरांना पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस स्टेशनला जायची आवश्यकता नाही; पोलीस आयुक्तांचे आदेश - Mumbai Passport Verification

पासपोर्ट पडताळणीसाठी मुंबईकरांना यापुढे पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. कारण यापुढे स्थानिक पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल अर्जदाराच्या घरी येऊन स्वत: पासपोर्टची पडताळणी करणार आहेत. अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

sanjay pandey
sanjay pandey
author img

By

Published : Mar 13, 2022, 4:55 PM IST

मुंबई - मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner) यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांचा पदभार स्वीकारल्यापासून वेगवेगळी घोषणा मुंबईकरांसाठी केली आहे. काही दिवसांपूर्वी संजय पांडे यांनी मुंबईत रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बांधकामांवर बंदी घातली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा शनिवारी एक नवी घोषणा केली आहे. पासपोर्ट पडताळणीसाठी मुंबईकरांना यापुढे पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. कारण यापुढे स्थानिक पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल अर्जदाराच्या घरी येऊन स्वत: पासपोर्टची पडताळणी करणार आहेत. अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. परंतु पासपोर्टसाठी लागणारी कागदपत्रं अपूर्ण असल्यास अर्जदारांना पोलीस ठाण्यात हजर रहावं लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • #PassportVerification. We have decided no citizen will be called to police station in Mumbai except in exceptional cases of documents being incomplete etc. If not followed do report🙏

    — Sanjay Pandey (@sanjayp_1) March 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
शनिवारी दुपारी पांडे यांनी हे ट्वीट केले. आम्ही निर्णय घेतला आहे की कागदपत्रे अपूर्ण असणे इत्यादी अपवादात्मक प्रकरणांशिवाय मुंबईतील कोणत्याही नागरिकाला पोलीस ठाण्यात बोलावले जाणार नाही. तसे घडल्यास याची मला तक्रार करा असे ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे. पांडे यांच्या या ट्वीटनंतर मग अधिकाऱ्यांसमोर कागदपत्रांसह हजर न राहताच पडताळणी कशी होणार? असा सवाल एका युझरने आयुक्तांना केला.
जरा सास तो लेने दो
पोलीस कर्मचारी स्वत: तुमच्या घरी येईल. जर कागदपत्रांत काही तफावत असेल तर त्याच्या पूर्ततेसाठी तुम्हाला फोन येईल असे उत्तर पांडे यांनी दिले. यावर खुश झालेल्या युझरने इतक्या कमी वेळात इतक्या झटपट बदलांची आम्हाला सवय नाही जरा सास तो लेने दो सर असे म्हणत धन्यवाद दिले. त्यावर मुंबईकर म्हणून गेल्या अनेक काळापासून माझ्या मनात हा विषय होता आणि त्याबाबत अनेकांना सल्लाही दिला होता म्हणून निर्णय घेतल्याचे पांडे यांनी सांगितले.
सोशल मिडीयाचा प्रभावी वापर
मुंबई पोलीस आयुक्त पदाची धुरा हाती घेतल्यानंतर संजय पांडे यांनी मुंबईकरांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहे. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई, नो पार्किंगमधील वाहने क्रेनद्वारे न उचलवण्याचा निर्णय, पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांसाठी आठ तास ड्यूटी, रात्रीच्या कन्स्ट्रक्शन कामांच्या त्रासाने बिल्डर प्रतिनिधींना ध्वनीप्रदुषण आणि इतर नियमांचे पालन करण्याचा सल्ला असे अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी घेतली. दरम्यान, संजय पांडे यांच्या निर्णयांचं सोशल मीडियावरून स्वागत करण्यात येत आहे. संजय पांडे यांनी सोशल मीडियावरुनही वारंवार मुंबईकरांशी तसेच पोलीस दलातील कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.