ETV Bharat / city

मुंबईकरांनो सावधान! घरातच थांबा, महापौरांचे आवाहन - किशोरी पेडणेकर

तौक्ते चक्रीवादळाने मुंबईला चांगलाच तडाखा दिला आहे. पहाटेपासून सुरू असलेला धुंवाधार पाऊस व जोरदार वारे यांनी अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. मुंबईकरांनी घरातच थांबा, असे आवाहन मुंबईच्या महापौरांनी केले आहे.

महापौरांचे आवाहन
महापौरांचे आवाहन
author img

By

Published : May 17, 2021, 3:17 PM IST

मुंबई - तौक्ते चक्रीवादळाने मुंबईला चांगलाच तडाखा दिला असून, पहाटेपासून सुरू असलेला धुंवाधार पाऊस व जोरदार वारे यांनी अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. मुंबईकरांनी घरातच थांबा, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

दादर येथील हिंदमाता व लगतच्या परिसरात पावसाचे पाणी साचले असून वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई महापालिकेच्या रेस्क्यू टीम्स कार्यरत झाल्या असून ठिकठिकाणी पडलेले वृक्ष छाटणीचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना घरातच थांबण्याचे आवाहन केले असून सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याने काळजी घ्यावी व अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये, असे महापौरांनी म्हटले आहे.

हेही वाचा - मुंबईत जनजीवन विस्कळीत; वाहतूक सेवा प्रभावित, एनडीआरएफ टीम दाखल

हेही वाचा - राजीव सातव यांच्यावर शासकीय इतमात अत्यसंस्कार; १५ ते २० हजार लोकांची गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.