मुंबई - केंद्र सरकार घेरण्यासाठी काँग्रेसने बेरोजगार युवकांचे प्रश्न हाती घेण्यास सुरवात केली आहे. यासाठी युवक काँग्रेसने गुरुवारी देशव्यापी मोहीम सुरू केली. नॅशनल रजिस्टर ऑफ अनएम्प्लॉयमेंट (एनआरयू) असे या मोहिमचे नाव आहे.
राष्ट्रीय स्तरावर बेरोजगारांनी त्यांच्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक प्रसिद्ध केला आहे. त्यावर मिस्ड कॉल देऊन बेरोजगारांनी द्यावे, असे म्हटले आहे. शुक्रवारी दादर स्थानकाबाहेर याबाबत जनजागृती करण्यात आली.
हेही वाचा... ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: आता लखमापूर गावही पांघरणार उजेड, गावातच होईल मोबाईल चार्ज
मागील दोन महिन्यांपासून काँग्रेस नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनपीआर या दोन कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहे. देशभरात आंदोलन सुरू केल्यानंतर आता काँग्रेसच्या अजेंड्यावर बेरोजगारी हा विषय आला आहे.
देशात बेरोजगारीचा दर हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामळे आम्ही राष्ट्रीय पातळीवर नॅशनल रजिस्टर ऑफ अनएम्पॉइड म्हणजेच एनआरयू मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत युवक काँग्रेसने बेरोजगारांच्या नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. त्यावर मिस्ड कॉल देऊन बेरोजगार युवक आपले समर्थन नोंदवू शकतात. बेरोजगारीविरोधात ही मोहीम सुरू केली आहे. आज मुंबईमध्येही या मोहिमेबाबत जनजागृती केली, असे युवक काँग्रेसचे अभिषेक मिस्त्री यांनी सांगितले.