ETV Bharat / city

Online Fraud : पिझ्झाचे पैसे परत मिळवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील एका आजीची 11 लाखांनी फसवणूक

author img

By

Published : Jan 16, 2022, 3:14 PM IST

ऑनलाइन व्यवहार करताना मुंबईत लाखो रुपयांची ( Mumbai Woman Cheated ) फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. एक पिझ्झा एका आजीबाईंना चक्क अकरा लाख रुपयांना पडला ( Woman Cheated While Ordering Pizza ) असून ऑनालाईन खरेदीच्या नादात आणि अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

cyber fraudters mumbai
cyber fraudters mumbai

मुंबई - ऑनलाइन व्यवहार करताना मुंबईत लाखो रुपयांची ( Mumbai Woman Cheated ) फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. एक पिझ्झा एका आजीबाईंना चक्क अकरा लाख रुपयांना पडला ( Woman Cheated While Ordering Pizza ) असून ऑनालाईन खरेदीच्या नादात आणि अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

कशी झाली फसवणूक? -

मुंबईच्या अंधेरी येथील रहिवासी असलेल्या या आजीला ऑनलाइन पिझ्झा आणि ड्रायफ्रूट ऑर्डर केली होती. त्यासाठी त्यांनी पैसे पाठविले. पण, बिलापेक्षा अधिक रक्कम त्यांनी चुकून पाठवली. ती परत कशी मिळवायची? या विवंचनेत त्या होत्या. त्यासाठी त्यांनी गुगलवर शोध घेतला. ऑनलाइन रक्कम परत मिळविण्याची माहिती देणारा एक मोबाईल क्रमांक मिळाला. त्यावर त्यांनी संपर्क केला आणि येथेच घोळ झाला. तेव्हा त्यांना एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्या अॅपवरून सायबर चोरट्यांनी त्यांचे बँक डिटेल, पासवर्डची माहिती घेतली. नंतर १४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२१ दरम्यान त्यांच्या खात्यातून तब्बल ११ लाख रुपये गायब झाल्याचे त्यांना लक्षात आले.

सायबर चोरांच्या हाती सोपविला तपशील -

त्यापूर्वी म्हणजे त्यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये पिझ्झा आणि ड्रायफ्रूटसाठी ऑनलाइन ऑर्डर दिली होती. तेव्हा ९९९९ रुपये आणि ड्रायफ्रूटसाठी २९ ऑक्टोबर मध्ये १४९६ रुपये जादा दिले होते. जादा दिलेली रक्कम त्या परत मिळविण्याचा प्रयत्न करत होत्या. या नादात त्यांनी अॅप डाउनलोड करून सर्व बँक माहिती आणि पासवर्डचा तपशील सायबर चोरांच्या हाती सोपविला. त्याचा त्यांना मोठा फटका बसला आहे. तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास आता सायबर पोलीस तपास करत आहे.

हेही वाचा - Statue of Shivaji Maharaj Removed : अमरावतीत पुतळ्यांचे राजकारण; शहरासह दर्यापूरमध्ये तणाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.