ETV Bharat / city

मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम आणि बीएमएम अंतिम वर्षाचा निकाल जाहीर - मुंबई विद्यापीठ बातमी

शैक्षणिक सत्र २०१९-२०च्या अंतिम वर्षाच्या नियमित परीक्षेतील बीकॉम सत्र ६चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेचा निकाल ९५.७९ टक्के एवढा लागला आहे. परीक्षेत एकूण ४९ हजार २९३ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

Mumbai University
Mumbai University
author img

By

Published : Oct 30, 2020, 2:26 PM IST

मुंबई - मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक सत्र २०१९-२०च्या अंतिम वर्षाच्या नियमित परीक्षेतील बीकॉम सत्र ६ चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेचा निकाल ९५.७९ टक्के एवढा लागला आहे. परीक्षेत एकूण ४९ हजार २९३ इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेसाठी ६४ हजार ७४७ इतक्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६४ हजार १८२ एवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, अशी माहिती विद्यापीठाचे उपकुलसचिव लीलाधर बनसोड यांनी दिली.

विद्यापीठाने पहिल्यांदाच या निकालासोबत नियमित मुख्य परीक्षेच्या सर्व निकालांच्या नमुना गुणपत्रिका, ग्रेड व छायाचित्रांसह विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या आहेत. ही नमुना गुणपत्रिका पाहण्यासाठी विद्यार्थ्यांने त्यांच्या महाविद्यालयांच्या नावाची निवड करून आसन क्रमांक टाकावा लागतो. त्यानंतर त्यांना ही गुणपत्रिका छायाचित्रासह पीडीएफ फॉर्मेटमध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती बनसोड यांनी दिली.

सोबतच विद्यापीठाने बीएमएम सत्र ६ या परीक्षेचाही निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेचा निकाल ९६.११ टक्के एवढा लागला आहे. या परीक्षेत एकूण ३ हजार ९५७ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेसाठी एकूण ४ हजार ९४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ हजार ९०९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. कोरोनाच्या काळात अनेक परीक्षा आणि त्यांचे नियोजन बिघडले होते. अशात मुंबई विद्यापीठाने मात्र आपल्या अनेक परीक्षांचा निकाल जाहीर करणे सुरू केले आहे. या परीक्षांचे निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहेत.

मुंबई विद्यापीठात मागील काही दिवसांत एटीकेटी आणि नियमित परीक्षांचा गोंधळ सुरू होता. गोंधळ निस्तरण्यासाठी यश आल्याने विद्यापीठाकडून सर्वांनी अंतिम परीक्षांचा निकाल जाहीर केला जात असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. विद्यापीठाच्या उर्वरित परीक्षांचे निकाल लावण्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी दिलीे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.