ETV Bharat / city

मुंबई विद्यापीठाकडून बीए, बीएस्सी व बीएमएसच्या अंतिम वर्षांचे निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाने सोमवारी अतिंम वर्षाच्या आणखी 13 परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. ज्यामध्ये बीए, बीएस्सी आणि बीएमएसच्या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत विद्यापीठाने एकून 87 परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत.

Mumbai University announces final year results
मुंबई विद्यापीठ
author img

By

Published : Nov 2, 2020, 10:31 PM IST

मुंबई - मुंबई विद्यापीठाने सोमवारी अतिंम वर्षाच्या आणखी 13 परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. ज्यामध्ये बीए, बीएस्सी आणि बीएमएसच्या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत विद्यापीठाने एकून 87 परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत.

दरम्यान बीए तृतीय वर्षाचा निकाल 94.70 टक्के लागला आहे. या परीक्षेला एकूण 13 हजार 637 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 9 हजार 782 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 100 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. बीएस्सी तृतीय वर्षाचा निकाल 97.85 लागला आहे. या परिक्षेसाठी एकूण 10 हजार 523 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 10 हजार 447 जण उत्तीर्ण झाले आहेत. तर बीएमएस च्या अंतिम वर्षाचा निकाल ९७.५८ टक्के लागला आहे. यामध्ये 13 हजार 166 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

येथे पाहू शकता निकाल
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी http://www.mumresults.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.