ETV Bharat / city

मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर - admission process time table for degree

मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी १८ जुलैपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत ६७ हजार ५१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून विविध अभ्यासक्रमांसाठी ५६ हजार १२९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

mumbai university
मुंबई विद्यापीठ
author img

By

Published : Jul 22, 2020, 5:50 AM IST

मुंबई - बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने पदवीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर केले. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालयात प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून पहिली मेरिट लिस्ट 4 ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे.

मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी १८ जुलैपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत ६७ हजार ५१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून विविध अभ्यासक्रमांसाठी ५६ हजार १२९ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा - सावधान...! त्वचेतील 'हे' बदलही असू शकतात कोरोनाची लक्षणे

प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती टाळण्यासाठी महाविद्यालयांनी ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करावा. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातील महाविद्यालयांना प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी येत असल्यास व प्रतिबंधित क्षेत्रात मोडत नसल्यास सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करून ऑफलाईन प्रक्रिया राबवू शकतात. विशेष बाब म्हणजे विद्यापीठाने यावर्षी विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील ( click on-Mumbai University Pre Admission online Registration 2020-21) या लिंकवर क्लिक करावे असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्यावतीने करण्यात आले आहे. तर दुसरीकडे नोंदणी करताना काही अडचणी आल्यास ०२०-६६८३४८२१ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला जाऊ शकतो.

हेही वाचा - ''लोकं मला केळीवाला म्हणतात'', फळविक्रेत्या धावपटूला कोरोनाचा फटका

विद्यार्थ्यांनी हमीपत्र फॉर्म भरून कोणत्याही एका महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. महाविद्यालयांनी हमीपत्राच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे तात्पूरते प्रवेश निश्चित करून विद्यार्थ्यांनी कागदपत्रांच्या मुळ प्रती सादर केल्यावर अंतिम प्रवेश दिला जाणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक...

  • अर्ज विक्री – २४ जुलै ते ०४ ऑगस्ट, २०२०
  • प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया – २२ जुलै ते ०४ ऑगस्ट, २०२० (१.०० वाजेपर्यंत)
  • एडमिशन फॉर्म सादर करण्याची तारीख – २७ जुलै ते ०४ ऑगस्ट, २०२० (३.०० वाजेपर्यंत) (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस एडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.
  • पहिली मेरीट लिस्ट – ०४ ऑगस्ट, २०२० ( सायंकाळी ७.०० वाजता)
  • कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – ०५ ऑगस्ट ते १० ऑगस्ट, २०२० (सायं.३.०० वाजे पर्यंत )
  • द्वितीय मेरीट लिस्ट – १० ऑगस्ट, २०२० ( सायं. ७.०० वा.)
  • कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट, २०२० ( सायं.३.०० वाजे पर्यंत
  • तृतीय मेरीट लिस्ट - १७ ऑगस्ट, २०२० ( सायं. ७.०० वा.)
  • कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) – १८ ते २१ ऑगस्ट, २०२०

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.