मुंबई - 2017 पासून आतापर्यंत तब्बल 400 कोटींची वसुली बाकी असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या दंडाच्या वसुलीसाठी मुंबई पोलिसांकडून विविध योजना आखण्यात आल्या आहे. मात्र, म्हणावा तितका दंड वसूल झाला नसल्याने अखेर वाहतूक पोलीस दंड न भरणाऱ्यांच्या दारी येणार आहेत.
हेही वाचा - राज्यातील परिचारिकांची 21 जूनपासून आंदोलनाची हाक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
2017 वर्षापासून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी अद्यावत प्रणाली अमलात आणली गेली. यासाठी ई-चलान प्रक्रिया राबण्यात आली. याद्वारे नियम मोडणाऱ्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर त्यांनी कुठे नियम मोडला आहे याचे फोटो आणि दंडाची रक्कम येत असे. तसेच, वाहतूक पोलिसांकडे असलेल्या उपकरणांतून संबंधित नियम मोडणाऱ्याच्या गाडीचा फोटो काढून त्याला मोबाईलवरच दंडाची रक्कम पाठवली जायची. जर रक्कम भरली नाही तर कारवाई देखील केली जात असे. मात्र दंडाची रक्कम म्हणावी तिककी वसूल झालीच नाही. वसुलीसाठी अनेक योजना देखील राबल्या गेल्या आहेत.
क्लॅम्पिंग स्क्वाड
दंड वसुलीसाठी क्लॅम्पिंग स्क्वाडची स्थापना देखील वाहतूक विभागाकडून करण्यात आली होती. जे वाहनधारक दंड भरत नाही अशा वाहनांना क्लॅम्प लावण्यात योतो. जो पर्यंत वाहन धारक दंडाची पूर्ण रक्कम भरत नाही, तो पर्यंत त्याच्या गाडीच्या क्लॅम्प काढण्यात येत नाही. या मोहिमेद्वारे देखील काही प्रमाणात दंडाची रक्कम वसूल करण्यात आली.
कॉल सेंटर
दंड वसुलीसाठी वाहतूक विभागाकडून कॉल सेंटर देखील सुरू करण्यात आले होते. याद्वारे ज्या वाहनधारकाने दंड भरला नाही त्यास फोनद्वारे संपर्क साधला जातो. आणि जे दंड चुकवत आहेत त्यांना दंड भरण्यासाठी प्रवृत्त करत आहे. या योजनेद्वारे 15 कोटी दंड वसूल झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
दंड वसुलीसाठी वाहतूक पोलिसांचे पथक येणार दारी
वाहतूक पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमासाठी ५० पथके तयार झाली आहेत. या पथकांना यादी देण्यात आली आहे. ही पथके ज्या वाहनधारकांचा दंड बाकी आहे त्यांच्या घरी जावून त्यांना दंड भरण्याच्या सूचना करणार आहेत. तसेच, त्यांना नोटीस देखील देणार आहे. 2017 पासून आता पर्यंत तब्बल 400 कोटींचा दंड बाकी असल्यामुळे या योजनेद्वारे हा दंड वसूल होण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा - शिक्षकांचे अनोखे आंदोलन, दहावीच्या निकालासाठी दंड भरून शिक्षकांचा लोकलने प्रवास