मुंबई - मुंबई वाहतूक पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता विवेक ऑबेरॉयविरुद्ध कारवाई केली आहे. हेल्मेट न घालता दुचाकी चालविल्याबद्दल विवेक ऑबेरॉयला दंड ठोठावण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी विवेकने हेल्मेटशिवाय दुचाकी चालविण्याची तक्रार मिळाली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
विवेक ओबेरॉयने १४ फेब्रुवारी रोजी स्वत: च्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यात तो हेल्मेटशिवाय दुचाकी चालवत होता. यावरून विवेकविरुध्द भादंवि कलम १८८, २६९ मोटार वाहन कायद्याच्या कलम १२९, १७७ आणि एपेडिक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - आजपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा, 'स्टार' खेळाडूंकडे असणार लक्ष