ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत आज पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले, 'इतक्या' जणांचा झाला मृत्यू

मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत आज पुन्हा वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत रुग्ण वाढले असून, ६१४९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामधील ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, १२ हजार ८१० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईत आज पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले
मुंबईत आज पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले
author img

By

Published : Jan 18, 2022, 7:25 PM IST

Updated : Jan 18, 2022, 8:03 PM IST

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. गुरुवारी १३७०२ शुक्रवारी ११३१७, शनिवारी १०६६१, रविवारी ७८९५, काल सोमवारी ५९५६ रुग्णांची नोंद झाली. आज मंगळवारी किंचित वाढ होऊन ६१४९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या घटत असल्याने सध्या ४४ हजार ८४ सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत १० लाख रुग्णांची नोंद

मुंबईत आज (१८ जानेवारीला) ६१४९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७ मृत्यूची नोंद झाली आहे. आज १२,८१० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ११ हजार ९६७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ९ लाख ४८ हजार ७४४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ४७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४४ हजार ०८४ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ६१ दिवस इतका आहे. मुंबईमधील ५२ इमारती सील आहेत. ११ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर १.१० टक्के इतका आहे.

८२.२ टक्के बेड रिक्त

मुंबईत आज आढळून आलेल्या ६१४९ रुग्णांपैकी ५१६५ म्हणजेच ८४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ५७५ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ९५ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३८,११६ बेडस असून त्यापैकी ५२६५ बेडवर म्हणजेच १३.८ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ८२.२ टक्के बेड रिक्त आहेत.

रुग्णसंख्येत चढउतार

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यात वाढ हाऊ लागली. ६ जानेवारीला २०,१८१, ७ जानेवारीला २०,९७१, ८ जानेवारीला २०,३१८, त्यानंतर रुग्णसंख्या घटली असून ९ जानेवारीला १९४७४, १० जानेवारीला १३६४८, ११ जानेवारीला ११६४७, १२ जानेवारीला १६४२०, १३ जानेवारीला १३७०२, १४ जानेवारीला ११३१७, १५ जानेवारीला १०६६१, १६ जानेवारीला ७८९५, १७ जानेवारीला ५९५६, १८ जानेवारीला ६१४९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

धारावीत ३३ रुग्ण

मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हॉटस्पॉट ठरली होती. पहिल्या लाटे दरम्यान सर्वाधिक ९४, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९९ रुग्ण आढळून आले होते. धारावीत गेले काही महिने कोरोनाचे १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. मात्र मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली. ७ जानेवारीला १५० तर ८ जानेवारीला १४७ सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत गेली. आज १८ जानेवारीला ३३ रुग्णांची नोंद झाली आहे.

Last Updated : Jan 18, 2022, 8:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.