ETV Bharat / city

CORONA VACCINATION : मुंबईत आज 6,310 तर आतापर्यंत 89 हजार 194 आरोग्य, फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस - कोरोना लसीकरण

मुंबईत आज 6,310 आरोग्य आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत एकूण 89 हजार 194 आरोग्य आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

mum_vaccination
mum_vaccination
author img

By

Published : Feb 9, 2021, 10:30 PM IST

मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असून 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत होती. आजपासून फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईत आज 6,310 आरोग्य आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत एकूण 89 हजार 194 आरोग्य आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

लसीकरणाची आकडेवारी -

देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन ऍपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे स्थगित करण्यात आली होती. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आज 23 लसीकरण केंद्रांवर 123 बूथवर 4050 आरोग्य कर्मचारी तर 5175 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 9225 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 3428 आरोग्य कर्मचारी तर 2882 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 6310 जणांना लस देण्यात आली. आज 6 जणांना सौम्य दुष्परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. मुंबईत आतापर्यंत 89 हजार 194 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

आज 6310 लसीकरण -

मुंबईत आज परळ येथील केईएम रुग्णालयात 700, सायन येथील टिळक रुग्णालय 334, विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटल 329, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय 729, सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय 46, कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय 587 घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय 666, बिकेसी येथील जंबो हॉस्पिटल 609, बांद्रा भाभा हॉस्पिटल 138, भायखळा येथील राज्य सरकारच्या जेजे हॉस्पिटल 76, सेव्हन हिल 380, गोरेगाव नेस्को 229, मा हॉस्पिटल 94, कस्तुरबा हॉस्पिटल 43, सेंटेनरी गोवंडी हॉस्पिटल 182, दहिसर जंबो 170, एस के पाटील हॉस्पिटल 178, बीएआरसी 157, एम डब्लू हॉस्पिटल 3l104, भगवती हॉस्पिटल 147, व्ही डी सावरकर हॉस्पिटल 257, मुलुंड जंबो 155 अशा एकूण 6310 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्करला लस देण्यात आली.

आतापर्यंत 89,194 लसीकरण -

16 जानेवारीपासून आतापार्यंत परळ येथील केईएम रुग्णालयात 11,167, सायन येथील टिळक रुग्णालय 5,565, विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटल 8158, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय 11139, सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय 1475, कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय 11773, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय 12151, बिकेसी येथील जंबो हॉस्पिटल 9460, बांद्रा भाभा हॉस्पिटल 4542, भायखळा येथील राज्य सरकारच्या जेजे हॉस्पिटल 709, सेव्हन हिल 3854, गोरेगाव नेस्को 3318, मा हॉस्पिटल 636, कस्तुरबा हॉस्पिटल 303, सेंटेनरी गोवंडी हॉस्पिटल 791, दहिसर जंबो 812, एस के पाटील हॉस्पिटल 865, बीएआरसी 711, एम डब्लू हॉस्पिटल 473, भगवती हॉस्पिटल 513, व्ही दि सावरकर हॉस्पिटल 624, मुलुंड जंबो 155 अशा एकूण 89 हजार 194 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्करला लस देण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.