ETV Bharat / city

मुंबई ते न्हावा-शेवा ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाचे २०२३ पर्यंत पूर्ण होणार काम - Uddhav Thackeray latest news

मुंबईला गतीमान करण्यासाठी विविध प्रकल्पांचे जाळे विणले जात आहेत. शहरातील वाहतूक कोंडी फुटण्यासाठी शिवडी ते न्हावा - शेवा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य होणार आहे.

कामकाजाची पाहणी करताना मुख्यमंत्री
कामकाजाची पाहणी करताना मुख्यमंत्री
author img

By

Published : Feb 13, 2021, 10:21 PM IST

Updated : Feb 13, 2021, 10:29 PM IST

मुंबई- शिवडी न्हावा- शेवा प्रकल्पाचे काम ३० टक्के पूर्ण झाले आहे. कोरोना काळात हे काम मंदावले होते. मात्र, आता कामाला वेग येणार असून २०२३ मध्ये हे काम मार्गी लागेल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. शनिवारी ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्प कामांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर.ए.राजीव आदी यावेळी उपस्थित होते.

मुंबईला गतीमान करण्यासाठी विविध प्रकल्पांचे जाळे विणले जात आहेत. शहरातील वाहतूक कोंडी फुटण्यासाठी शिवडी ते न्हावा - शेवा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य होणार आहे. मुंबई व नवी मुंबई आणि कोकण यांमधील अंतर कमी झाल्यामुळे इंधन व वाहतूक खर्चात बचत होणार आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव सुमारे ३० वर्षापूर्वीपासून करण्यात आला होता. मुंबई व नवी मुंबई यामधील वाहतूक वेगवान व्हावी या हेतूने मुंबई बेटावरील शिवडी ते नवी मुंबईतील न्हावा या दरम्यान पूल बांधण्याचा विचार करण्यात आला होता. राज्य सरकारने ४ फेब्रुवारी २००९ च्या निर्णयान्वये या प्रकल्पाची मालकी व अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे असणार आहे. या प्रकल्पाकरीता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे निधी उपलब्ध करुन देणार आहे.

मुंबई ते न्हावा-शेवा ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाचे २०२३ पर्यंत पूर्ण होणार काम

हेही वाचा-जेजुरीत शरद पवारांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण

वाहतूक कोंडी फुटणार
मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या २२ किमी लांबीच्या ६ पदरी (३ + ३ मार्गिका) पुलाचा अंतर्भाव असणार आहे. या पुलाची समुद्रातील लांबी १६.५ किमी असून जमिनीवरील पुलाची लांबी ५.५ किमी इतकी आहे. मुंबई शहरातील शिवडी आणि नवी मुंबईतील शिवाजीनगर, राज्य मार्ग-५४ व राष्ट्रीय महामार्ग ४ वर चिले गावाजवळ आंतरबदल असणार आहेत. या प्रकल्पामुळे नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील प्रदेशाचा विकास होणार आहे. त्यामुळे मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा-विशेष : नर्मदेकाठी पिंजऱ्यातील मत्स्यपालनामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवे साधन

१७ हजार ८४३ कोटींचा खर्च
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मुंबई पारबंदर प्रकल्पाची अंमलबजावणी जायका या जपानी सरकारच्या पुरस्कृत संस्थेकडून होणार आहे. यासाठी कंपनीला कर्ज उपलब्ध करुन दिले जाईल. कर्ज देण्याबाबत व्यवहार्यता तपासण्याकरीता सल्लागार नियुक्त करून प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच तांत्रिक बाबींसोबतच प्रकल्पाचा पर्यावरणावर व सामाजिक जीवनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जाईल. या प्रकल्पाचा प्राथमिक सर्वेक्षणाबाबतचा अंतिम अहवाल ऑगस्ट २०१६ मध्ये प्राप्त झाला आहे. या प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत १७,८४३ कोटी रुपये इतकी निश्चित केली आहे. या किंमतीमध्ये बांधकामाची किंमत, महागाई, आकस्मिक बाबींवरील खर्च, भूसंपादन, प्रशासकीय खर्च, बांधकामाच्या कालावधीतील व्याज इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. ३१ मार्च २०१७ आणि २७ मार्च, २०२० रोजी कर्जाबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रशासनाने दिली.

तीन ठेकेदारांना काम
प्रकल्पाचे इंटेलीजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम कंत्राटाद्वारे केले जाणार आहे. प्रकल्पाच्या पॅकेज-१ करीता लार्सन अँड टुब्रो लि., आयएचआय इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम कं. लि. कंसोशिअन यांची पॅकेज-२ करीता देवू इंजिनिअरींग अँड कन्स्ट्रक्शन कंपनी लि., टाटा प्रोजेक्ट्स लि., जेव्ही यांची आणि पॅकेज-३ करीता लार्सन अँड टुब्रो लि. यांची कंत्राटदार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कंत्राटदारांना २३ मार्च, २०१८ रोजी काम सुरु करण्याचे आदेश दिले होते. यात प्रकल्पाच्या पाईल, पाईल कॅप व पुलाचे खांबाचे बांधकाम सुरु आहे. पुलाचे सेगमेंट बनविण्याचे काम कास्टींग यार्डमध्ये सुरू केले आहे. पुलाच्या गाळयाचे सेगमेंट उभारणीचे काम अणि तात्पुरत्या पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. सद्य:स्थितीत प्रकल्पाची अर्थिक प्रगती सुमारे ४२ टक्के इतकी झाली आहे. प्रकल्पाचे बांधकाम सुमारे साडेचार वर्षात पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला.

Last Updated : Feb 13, 2021, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.