मुंबई - शहरात रविवारी रात्री पाऊस झाला. त्यामुळे मुंबईच्या तापमानात घट झाल्याची नोंद झाली आहे. पाऊस पडल्याने हवेतील गारवा मात्र वाढला आहे. अनेक ठिकाणी शेकोटी पेटवून त्याच्याभोवती लोक हात शेकतानाचे दृश्य नजरेस पडले.
अलीकडेच मुंबईचे तापमान १३-१४ अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरले होते. यामुळे मुंबईकरांना हुडहुडी भरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. रविवारी रात्री झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा मायानगरीच्या तापमानात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दोन दिवस पावसाचा अंदाज
तथापि आज (सोमवार) थंडी जास्त नसली तरीही हवामान खात्यानुसार, ६ ते ७ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहणार असून पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या संकेतस्थळावर यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.