मुंबई: कोरोणाचा प्रभाव जगभरात वाढत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात शेअर बाजारावर मंदीचे सावट पसरले होते, मात्र या आठवड्याची सुरुवात अतिशय सकारात्मक झाली असून आज सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली तसेच राष्ट्रीय शेअर बाजारातही तेजीचे वातावरण होते.
निफ्टी मध्येही ११२ अंकांची वाढ
मुंबई शेअर बाजारात आज सकाळी ४०२ अंकांची वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे निर्देशांक ०.६७ टक्क्यांनी वाढ होऊन ६०१४७ अंशांवर पोहोचला. तर निफ्टी मध्येही ११२ अंकांची वाढ झाल्याने ०.६७ टक्क्यांची वाढ नोंदवत निफ्टी १७ हजार ९२४ अंशांवर पोहोचला. सुमारे १८९४ शेअर्समध्ये वाढ ३९६ शेअर्स मध्ये घट तर १८२ शेअर्स मध्ये काहीही बदल झाला नाही.
या कंपन्यांना झाला फायदा
टीसीएस, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक ,ॲक्सिस बँक, मारुती सुझुकी या कंपन्यांना फायदा झाल्याचे दिसून आले. तर विप्रो ,सिप्ला ,नेसले ,सन फार्मा आणि एच सी एल टेक्नॉलॉजी या कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण झाली.
Stock Exchange : मुंबई शेअर बाजाराची सकारात्मक सुरूवात 400 अंकाची उसळी - मुंबई शेअर बाजार
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज बाजार सुरू होताच मुंबई शेअर बाजारात ( Mumbai Stock Exchange ) ४०० अंकांची उसळी पाहायला मिळाली तर निफ्टी मध्येही ११२ अंकांनी वाढ झाली आहे. ही सकारात्मक सुरुवात ( starts positive) असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.