मुंबई - शहरी नक्षलवाद प्रकरणातील ( Urban Naxalism case ) आरोपी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे ( Professor Anand Teltumbde ) यांनी अंतरिम जामीन मिळण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयातील ( Mumbai Sessions Court ) विशेष एनआयए न्यायालयात ( Special NIA Court ) अर्ज केला होते. या अर्जात त्यांनी नुकत्याच झालेल्या नक्षलवादी चकमकीत मारला गेलेला आपला भाऊ आणि जहाल नक्षली मिलिंद तेलतुंबडेच्या ( Naxalite Milind Teltumbde ) मृत्यूचं कारण दिलं आहे. त्याची 90 वर्षीय आई एकटी पडली आहे. तिला भेटण्यासाठी भाऊ आनंद तेलतुंबडे याने 15 दिवसांच्या अंतरिम जामिनासाठी याचिका ( Petition for interim bail ) दाखल केली होती. मात्र ही याचिता विशेष एनआयए न्यायालयाने बुधवार (दि 1) रोजी फेटाळली आहे.
गडचिरोलीतील कोर्चीमध्ये स्पेशल फोर्ससोबत झालेल्या चकमकीत 26 नक्षली ठार झाले होते. यामध्ये मिलिंद तेलतुंबडेचाही समावेश आहे. साल 2018 च्या एल्गार परिषद प्रकरणात ( Elgar Council case ) मिलिंद तेलतुंबडे फरार आरोपी म्हणून घोषित करण्यात आला होता. आणि याच एल्गार परिषद प्रकरणात आनंद तेलतुंबडेदेखील आरोपी आहेत. तेलतुंबडे यांच्यावर एनआयएने गंभीर आरोप केले असून आरोपपत्रही दाखल केलेले आहे. नव्वदच्या दशकात मिलिंदचा आणि आमच्या कुटुंबाचा संबंध तुटला आणि तो कोणाच्याच संपर्कात नव्हता. आपल्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून आईचे वयही आता नव्वदच्या आसपास आहे. त्यामुळे घरातील मोठा मुलगा या नात्यानं अशा प्रसंगी आपण कुटुंबासोबत असण भावनिक दृष्ट्या आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला किमान 15 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी मागणी आनंद तेलतुंबडे यांनी या जामीन अर्जात केली होती. मात्र न्यायालयाने मागणी फेटाळून लावत जामीन नामंजूर केला आहे.
भीमा कोरेगाव ( Bhima Koregaon ) येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आणि शहरी नक्षलवाद प्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर प्रा. आनंद तेलतुंबडेंना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तेलतुंबडे हे नवी मुंबईतील तळोजा कारागृहात ( Taloja Jail )आहेत. जुलै 2021 मध्ये विशेष एनआयए न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.