ETV Bharat / city

Aryan Khan: मुंबई सत्र न्यायालयाचा आर्यन खानला दिलासा! पासपोर्ट मिळवण्याबाबतचा अर्ज कोर्टाकडून मंजूर - Aryan Khan Drugs Case

ड्रग्ज प्रकरणाता सुमारे 27 दिवस जेलबंद राहिलेल्या आर्यन खानला मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. ( Aryan Khan Passport Application ) आर्यन खानचा पासपोर्ट मिळवण्याबाबतचा आर्ज कोर्टाने मंजूर केला आहे.

मुंबई सत्र न्यायालयाचा आर्यन खानला दिलासा

author img

By

Published : Jul 13, 2022, 6:20 PM IST

मुंबई - कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपी आर्यन खानला एनसीबीने क्लीन चीट दिल्यानंतर आर्यन खानला मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. ( Mumbai Sessions Court ) आर्यन खानने पासपोर्ट परत मिळण्यासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयात विशेष एनडीपीएस कोर्टाने आज बुधवार (दि. 13 जुलै)रोजी मंजूर केला आहे. त्यामुळे आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे.

पासपोर्ट परत करण्याचे निर्देश - आर्यन खानने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टाने एनसीबीला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. ( Aryan Khan Drugs Case ) हे आदेश विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी निर्देश दिले होते. त्यावर एनसीवी करून कुठलीही हरकत घेण्यात आली नसल्याने आज सुनावणीदरम्यान आर्यन खानला पासपोर्ट परत करण्याचे निर्देश न्यायाधीश वैभव पाटील यांनी दिले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता - या प्रकरणातील आरोप पत्र 27 मे रोजी सादर केलेल्या त्यावेळी एनसीबीने आर्यनसह सहा आरोपींवरील आरोप वगळले. पुरेशा पुराव्याअभावी त्यांना सोडून दिले होते. आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि क्रूझ पाहुणे मुनमुन धमेचा यांना 3 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आले होते. त्यांना महिन्याच्या अखेरीस मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. आर्यनवर कुठलेही औषध सापडले नाही. मर्चंट आणि धामेचा यांचा आरोपपत्रात समावेश आहे. एफआयआरमध्ये 20 आरोपींची नावे आहेत. कथित अमली पदार्थ तस्कर अब्दुल कादर आणि नायजेरियन नागरिक चिनेदू इग्वे हे दोनच आरोपी तुरुंगात आहेत.

आर्यनला जामीन मिळण्याची ही तीन महत्वाची कारणे

  • आर्यनच्या ज्या मित्राकडे चरस सापडले होते त्याने त्याचवेळी स्पष्ट केले की ते आर्यनसाठी नव्हते. उलट आर्यन त्याला सांगत होता की ड्रग्ज घेऊ नको, एनसीबी सतर्क आहे, अशी माहिती त्या मित्राने आपल्या जबाबात दिली होती.
  • आर्यन खानच्या व्हॉटसअ‍ॅप चॅट बाबतही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्या चॅटमध्ये या केसचा संबंध आलेला नाही.
  • आर्यन खानने ड्रग्ज घेतल्याचा आरोप होता. पण त्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणीच करण्यात आली नाही.

  • नेमकं प्रकरण काय?

आर्यन खान हा 27 दिवस जेलमध्ये होता - मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी कार्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरु असल्याचे उघडकीस आले होते. या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खान हा 27 दिवस जेलमध्ये रहाव लागले होते. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे व्हाट्सअ‌ॅप चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश समोर आला आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचंदेखील नाव आहे.

तीन दिवस सतत सुरू होता - आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या दोघांतील व्हाट्सअ‌ॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केला होता. त्यामुळे आर्यनला जामीन मिळण्यास अडचण झाली होती. मुंबई विशेष न्यायालयाने आर्यन खानची जामीन फेटाळून लावली होती. मात्र, त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानने जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर तीन दिवस सतत सुरू असलेल्या युक्तिवादानंतर अखेर आर्यन खानला जामीन मंजूर झाली होता.

हेही वाचा - शिवसेनेचा ताक फुकून पिण्याचा निर्णय! मुर्मू यांना पाठिंबा दिल्याने खासदारांचे बंड थांबणार का? वाचा, सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.