ETV Bharat / city

Rhea Chakraborty IIFA Award Permission : रिया चक्रवर्तीला आयफा अवार्ड सोहळ्यासाठी परदेशात जाण्याची मुंबई सत्र न्यायालयाची परवानगी - रिया चक्रवर्ती दुबई परवानगी बातमी

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ( Rhea Chakraborty ) मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. रिया चक्रवर्तीला आयफा अवॉर्ड ( Rhea Chakraborty IIFA Award Permission ) सोहळ्यात सहभागी होण्याकरीता मुंबई सत्र न्यायालयाने आज परवानगी दिली आहे.

Rhea Chakraborty IIFA Award Permission
Rhea Chakraborty IIFA Award Permission
author img

By

Published : Jun 1, 2022, 5:46 PM IST

Updated : Jun 1, 2022, 6:26 PM IST

मुंबई - अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ( Rhea Chakraborty ) मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. रिया चक्रवर्तीला आयफा अवॉर्ड ( Rhea Chakraborty Iffa Award Permission ) सोहळ्यात सहभागी होण्याकरीता मुंबई सत्र न्यायालयाने आज परवानगी दिली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. रिया चक्रवतीला या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन देता वेळी काही अटी व शर्तीच्या आधारावर जामीन मंजूर केला होता. त्यावेळी रिया चक्रवर्तीला परदेशात जाण्यास मनाई करण्यात आली होती, तसेच पासपोर्टदेखील न्यायालयाने जप्त केले होते.

नोव्हेंबरमध्ये जामिन मंजूर - बॉलीवूड कलाकारांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा आयफा अवॉर्ड सोहळ्यात यावर्षी अबूधाबीत रंगणार यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याकरिता रिया चक्रवर्तीने मुंबई सत्र न्यायालयात परवानगी मिळण्याकरिता अर्ज दाखल केला होता. याला आज मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केले असून 2 जून ते 6 जून दरम्यान होणाऱ्या आयफा अवॉर्ड सोहळ्यात जाण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. 14 जून 2020 रोजी मुंबईतल्या राहत्या घरी सुशांतचा मृतदेह आढळला होता. वयाच्या 34 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान रिया चक्रवर्तीवर पैसे उकळल्याचा आरोप झाला. ड्रग्ज कनेक्शनच्या तपासात रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना एनसीबीनं अटक केली होती. मुंबईतल्या भायखळा जेलमध्ये रिया महिनाभर होती तर तिचा भाऊ शौविक याने तीन महिने तुरुंगात काढले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिला जामिन मंजूर झाला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर तब्बल 9 महिन्यांनंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले होते. अभिनेत्याच्या मृत्यूच्या प्रकरणात एनसीबी ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत आहे. एनसीबीने मुंबईसत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. ही आरोपपत्र जवळपास ३० हजार पानांची आहे. 30 हजार पानांच्या दोषारोपपत्रात 12 हजार पानांची हार्ड कॉफी आणि सीडीमधील पुरावे यांचा समावेश आहे. या दोषरोपपत्रात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आरोपी नं. 10 आहे.

ईडी चौकशीदरम्यान उघड झाले ड्रग चॅट - या प्रकरणी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एफआयआर नोंदविला होता. सुशांत केसमधील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करणारे एनफोर्समेंट डायरेक्टरेट (ईडी) यांना रिया आणि शौविकच्या फोनवर ड्रग्स चॅट मिळाले. ईडीने एनसीबीला ही माहिती दिली होती, त्यानंतर एनसीबीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. या ड्रग चॅटमध्ये सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया साहा ते दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरंडा अशी नावे होती.रिया, शौविक, दीपेश आणि सॅम्युअल यांनी जामिनावर सुटका केली. तपासादरम्यान एनसीबीने रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांना ड्रग्ज पुरवण्याच्या आरोपाखाली अटक केली. हे सर्व सध्या जामिनावर सुटले आहेत.

बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी ड्रग्सचं कनेक्शन - तपासणी दरम्यान ड्रग्स माफियांशी बॉलिवूडच्या अनेक बड्या सेलिब्रिटींशी कनेक्शन जोडले गेलेले आढळले. या ख्यातनाम व्यक्तींची नावे ड्रग्स पेडलर्स यांच्या चौकशीदरम्यान समोर आली होते. त्यानंतर एनसीबीने दीपिका पादुकोण ते सारा अली खान आणि रकुल प्रीतसिंग ते मधु मंटेना यांची या प्रकरणांची चौकशी केली होती. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्यांच्या व्यवस्थापकांवरही प्रश्नचिन्ह निर्माण करत चौकशी केली होती. या चौकशी आणि प्राथमिक पुराव्यांच्या आधारे रिया आणि शौविक यांना अटक करण्यात आली होती. सध्या दोघे जामिनावर बाहेर आहेत.

हेही वाचा - Sachin Vaze : सचिन वाझे माफीचा साक्षीदार; अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार

Last Updated : Jun 1, 2022, 6:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.