ETV Bharat / city

Bail To Rana Kapoor : राणा कपूर यांना अवांता प्रकरणात सशर्त जामीन मंजूर - CBI

येस बँकेचे ( Yes Bank ) संस्थापक राणा कपूर ( Rana Kapoor ) यांना मुंबई सत्र न्यायालयाने ( Mumbai Session Court ) अवांता प्रकरणात ( Avanta Case ) सशर्त जामीन मंजूर केला ( Granted Conditional Bail ) आहे.

मुंबई सत्र न्यायालय
मुंबई सत्र न्यायालय
author img

By

Published : Feb 16, 2022, 4:38 PM IST

Updated : Feb 16, 2022, 8:27 PM IST

मुंबई - येस बँकेचे ( Yes Bank ) संस्थापक राणा कपूर ( Rana Kapoor ) त्यांची अवांता समूहामध्ये आर्थिक गैरव्यवहार ( Avanta Case ) झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात बुधवारी (दि. 16 फेब्रुवारी) मुंबई सत्र न्यायालयाने राणा कपूर यांचा जामीन अर्ज काही अटी व शर्तीवर मंजूर करण्यात आला आहे.

सीबीआयने ( CBI ) अमृता शेरगीलच्या ( Amruta Shergil ) मालमत्ते खरेदीच्या वेळी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी प्रथम सीबीआयने याबाबत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास ईडीनेही केला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार आढळून आल्यानंतर राणा कपूर यांना अटकही करण्यात आली होती. राणा कपूर यांचा जामीन अर्ज आज मुंबई सत्र न्यायालयाने सशर्त मंजूर केला आहे. भारताबाहेर न जाणे, ही यातील प्रमुख अट असून न्यायालयाने राणा कपूर यांना पासपोर्ट न्यायालयासमोर जमा करण्याचे निर्देशही दिले आहेत.

काय आहे प्रकरण..? - मार्च 2020 मध्ये, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने कपूर, त्यांची पत्नी बिंदू, अवंता ग्रुपचे प्रवर्तक थापर आणि ब्लिस अबोड प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक आणि बेकायदेशीर कृत्ये या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

हे प्रकरण दिल्लीच्या अप मार्केट एरिया अमृता शेरगिल मार्गावरील थापर यांच्या अवंता रिअॅल्टी लिमिटेडच्या मालकीच्या बंगल्याभोवती आहे. समूहाने बंगला तारण ठेवून येस बँकेकडून कर्ज घेतले होते. पण, कर्ज बुडाले आणि येस बँकेने बंगल्याचा ताबा घेतला, असा आरोप होता. कपूर यांनी ब्लिस अॅबोडला तो बंगला विकला. सीबीआयच्या पहिल्या माहिती अहवालात कपूर आणि त्यांच्या पत्नीला अवांता ग्रुपला तब्बल 1 हजार 900 कोटी रुपयांचे कर्ज देण्याच्या बदल्यात बाजारभावाच्या निम्म्याने बंगल्याच्या रूपात 307 कोटी रुपयांची लाच देण्यात आली होती.

सीबीआयने आरोप केला होता की कपूरच्या नेतृत्वाखाली येस बँकेने अतिरिक्त कर्ज मंजूर करण्याबरोबरच सवलती, शिथिलता आणि विद्यमान क्रेडिट सुविधांमध्ये माफी देऊन अवांता ग्रुप कंपन्यांना मदत केली. आयसीआयसीआय बँकेने अमृता शेरगिलच्या बंगल्याची किंमत 550 कोटी रुपये असल्याचे सीबीआयने म्हटले होते.

हेही वाचा - Dilip Yedatkar Criticize Navneet Rana : मतदारांची फसवणूक करणाऱ्या खासदारांनी काँग्रेस विरोधात बोलूच नये : काँग्रेस नेते दिलीप एडतकर

Last Updated : Feb 16, 2022, 8:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.