ETV Bharat / city

मुंबईतील शाळा आणि जिमखान्यांचे लसीकरण केंद्रात रूपांतर! - पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी

मुंबई महानगर पालिकेने लसीकरण मोहीमेचा आराखडा तयार केला. त्यानुसार 8 मोठी लसीकरण केंद्र तयार करण्यात येत आहेत.

लसीकरण केंद्र
लसीकरण केंद्र
author img

By

Published : Dec 24, 2020, 3:45 PM IST

मुंबई - कोरोनावरील लस नव्या वर्षाच्या सुरुवातीला उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यासाठीच मुंबई महानगर पालिकेने लसीकरण मोहीमेचा आराखडा तयार केला. त्यानुसार 8 मोठी लसीकरण केंद्र तयार करण्यात येत आहेत. दरम्यान लसीकरण मोहिमेला वेग आल्यास ही केंद्रे कमी पडणार असल्याने पालिकेने शाळा आणि जिमखान्याचे रूपांतर लसीकरण केंद्रात करण्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या टप्प्यात हा केंद्राचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

पहिल्या टप्प्यात कोरोना योध्याना लस-

कोरोनाची लस लवकरच उपलब्ध होणार असून मुंबईची लोकसंख्या प्रचंड आहे. त्यामुळे लसीकरणासाठी पालिकेने टप्पे आणि प्राधान्यक्रम ठरवला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धे अर्थात सरकारी, पालिका कर्मचारी, खासगी डॉक्टर, नर्स-वॉर्डबॉय यांना लस देण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्स अर्थात पोलीस, सफाई कर्मचारी आदींना लस देण्यात येणार आहे. तिसरा टप्पा हा 50 वर्षांवरील नागरिकांचा आणि सहव्याधी असलेल्याना लस देण्यात येणार आहे. पुढे आणखी टप्पे ठरवत सर्व नागरिकांपर्यंत लस पोहचवली जाणार आहे.

सद्या 8 केंद्रात लसीकरण-

लसीकरण मोहीमेच्या पूर्वतयारीला पालिकेने वेग दिला आहे. त्यानुसार 8 केंद्र तयार केली जात असून या केंद्रात लस दिली जाणार आहे. पालिकेच्या नायर, केईएम, सायन आणि कूपर या मुख्य रुग्णालयासह ट्रॉमा केअर, वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, राजावाडी या रुग्णालयात लसीकरण केंद्र असणार आहेत. या केंद्रात सुमारे दीड लाख कोरोना योध्याना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहेत.

म्हणून शाळा-जिमखाने कोविड विलगीकरणात रूपांतरीत-

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या जशी वाढू लागली. तशी सरकारी-पालिका रुग्णालये कमी पडू लागली होती. तर दुसरीकडे संशयित रुग्णांचे विलगीकरण मोठ्या प्रमाणावर करावे लागले होते. त्यासाठी जागा कमी पडू लागल्याने खासगी-पालिका शाळा, जिमखानेही विलगीकरण केंद्र म्हणून ताब्यात घेण्यात आली. आता रुग्ण संख्या कमी झाल्याने ही केंद्रे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत.

आता शाळा-जिमखाने होणार लसीकरण केंद्र-

विलगीकरण केंद्र म्हणून शाळा-जिमखाने यांचा वापर करण्यात आला. तर आता पुढे याच शाळा आणि जिमखान्याचा वापर लसीकरण केंद्र म्हणून आम्ही करणार आहोत, अशी माहिती काकाणी यांनी दिली आहे. तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील नागरिक आणि सहव्याधी असलेल्याना लस दिली जाणार आहे. तेव्हा त्यांना जवळपासचे केंद्र उपलब्ध करून देणे वयोमान आणि आजार पाहता गरजेचे आहे. तर या टप्प्यातील नागरिकांची संख्या खूप मोठी असणार आहे. त्यामुळे 8 केंद्र कमी पडतील. वरील दोन्ही बाबी लक्षात घेता शाळा-जिमखान्याचे रूपांतर येत्या काळात लसीकरण केंद्र म्हणून करण्यात येणार आहे.

हेही वाचा- मुंबईत ५२६ कोरोनामुक्त रुग्णांवर पोस्ट ओपीडीत उपचार

हेही वाचा- मनसे विरुद्ध अ‌ॅमेझोन; दिंडोशी न्यायालयाची राज ठाकरेंना नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.