ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत सप्टेंबरमध्ये चौथ्यांदा कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची नोंद शून्यावर, आज आढळले १४६ नवे रुग्ण - Mumbai Corona Update

मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार कमी झाला असून आज १४६ रुग्णांची 146 new corona patients found in Mumbai नोंद झाली आहे. मुंबईत आज शून्य मृत्यूची नोंद Mumbai recorded zero deaths of Corona झाली आहे. सप्टेंबर महिन्यात चौथ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

मुंबईत सप्टेंबरमध्ये चौथ्यांदा कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची नोंद शून्यावर

author img

By

Published : Sep 17, 2022, 8:37 PM IST

मुंबई : मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार कमी झाला असून आज १४६ रुग्णांची 146 new corona patients found in Mumbai नोंद झाली आहे. मुंबईत आज शून्य मृत्यूची नोंद Mumbai recorded zero deaths of Corona झाली आहे. सप्टेंबर महिन्यात चौथ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या ११५४ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

१४६ नवे रुग्ण - मुंबईत आज १८ सप्टेंबरला ८०२६ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १४६ रुग्णांची नोंद झाली. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. २०९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ४८ हजार ९४५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख २८ हजार ०६८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ११५४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४६५० दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०१५ टक्के इतका आहे.

रुग्णसंख्या घटतेय- मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. १८ ऑगस्टला १२०१ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊ लागली आहे. १ सप्टेंबरला २७२, २ सप्टेंबरला ४०२, ३ सप्टेंबरला ३९४, ४ सप्टेंबरला ३७६, ५ सप्टेंबरला १७३, ६ सप्टेंबरला २८५, ७ सप्टेंबरला ३१६, ८ सप्टेंबरला २९०, ९ सप्टेंबरला २५१, १० सप्टेंबरला २०९, ११ सप्टेंबरला १८७, १२ सप्टेंबरला १२८, १३ सप्टेंबरला १९३, १५ सप्टेंबरला २०३, १६ सप्टेंबरला १३८, १७ सप्टेंबरला १५९, १८ सप्टेंबरला १४६ रुग्णांची नोंद झाली आहे.

१२३ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १२३ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा, ऑगस्ट महिन्यात ७ वेळा, सप्टेंबर महिन्यात ४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.