मुंबई - रविवारी सकाळीदेखील पावसाचा जोर कायम राहिला आहे. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले आहे.
- दिंडोशी दुर्घटना: जखमींची नावे - मोहम्मद शेख (वय १५), झुबेदा शेख (वय ७०), अहेमद शेख (वय १४), अब्दुल शेख (वय ४५). सर्वांची प्रकृती स्थिर.
- दिंंडोशी गोरेगाव येथे दरड कोसळून चार जखमी, जखमींना जोगेश्वरी ट्रॉमा केअर रूग्णालयात केले दाखल.
- एनडीआरएफची आठ पथके ठिकठिकाणी तैनात.
पेण (रायगड), कादवली (ठाणे), शहद (कल्याण), कुर्ला, परेल, कामशेत (पुणे), हिंजवडी/मुळशी (पुणे) आणि चांदोरी (नाशिक) याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.
- पावसामुळे रस्ते वाहतूकदेखील विस्कळीत.
वाहतूकीसाठी बदललेले मार्ग-
१. समाज मंदिर हॉल प्रतिक्षा नगर, हेमंत मांजरेकर रोड मार्गे
२. मोतीलाल नगर पोस्ट ऑफिस, बेस्ट नगर मार्गे
३. साईनाथ सब-वे, मदिना मंझिल मार्गे
४. सायन रोड नं २४, सायन रोड नं ३ मार्गे
५. दहिसर सब-वे अप आणि डाऊन, सुधीर फडके फ्लायओव्हर मार्गे
६. मिलन सब-वे, मिलन फ्लायओव्हर मार्गे
७. डहाणूकर वाडी, बोरसा पाडा मार्गे - मुंबई शहरात गेल्या 24 तासांमध्ये 146 मिलिमीटर पावसाची नोंद. तर, पूर्व उनगरात 195 मिलिमीटर आणि पश्चिम उनगरात 195 मिलिमीटर पावसाची नोंद.
- मध्य रेल्वेच्या सहा गाड्या रद्द, सहा गाड्यांचा मार्ग बदलला आणि एक गाडी शॉर्ट टर्मिनेटेड.
या सहा गाड्या झाल्या आहेत रद्द -
२२१०१ मुंबई-मनमाड राज्यराणी एक्सप्रेस
२२१०२ मनमाड-मुंबई राज्यराणी एक्सप्रेस
१२११८ मनमाड-एलटीटी एक्सप्रेस
१२११७ एलटीटी-मनमाड एक्सप्रेस
५१०३३ मुंबई-साईनगर शिर्डी फास्ट पॅसेंजर
५१०४४ साईनगर शिर्डी-मुंबई फास्ट पॅसेंजर - मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे तसेच नागरिकांनाही घराबाहेर न पडण्याचे आवाहन.
- समुद्रात भरतीमुळे ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा येण्याचा अंदाज.
- वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता.
- हार्बर मार्गावर सीएसएमटी-वडाळा, वाशी-पनवेल, सीएसएमटी-अंधेरी-गोरेगाव मार्गांवर रेल्वे सेवा सुरू.
- हार्बर मार्गावरील वडाळा-कुर्ला रेल्वे सेवा बंद.
- कुर्ला-सायन दरम्यान रेल्वे सेवा बंद.
- कल्याण रेल्वे स्थानकात पाणी साचण्यास सुरुवात.
- अंबरनाथ, बदलापूर, चुनाभट्टी रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने अंबरनाथ पुढे रेल्वे सेवा बंद.
- मध्य रेल्वे सेवेवर परिणाम.
- अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले.
मुंबईत अनेक ठिकाणी रात्री पासून पाऊस पडत आहे. पावसाचा जोर काही ठिकाणी कायम असल्याने अंधेरी सबवे, मालाड सबवे, सायन, किंग सर्कल, हिंदमाता, वांद्रे नॅशनल कॉलेज, एलबीएस रोड आदींसह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे.