मुंबई - राज्यात तणावाचे वातावरण असताना कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून ( Mumbai police deleting controversy post ) सतर्कता पाळली जात आहे. मात्र, समाजात तेढ निर्माण करण्यासाठी काही समाजकंटक सोशल मीडियाचा ( Mumbai Police Social Media Lab deleting post ) वापर मोठ्या प्रमाणात करतात. दोन समाजात वाद निर्माण होतील अशा पोस्टचा भडिमार सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र, या पोस्ट हटवण्याचे काम देखील पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे.
हेही वाचा - Meeting of Congress Ministers : काँग्रेस मंत्र्यांची आज आढावा बैठक, कामकाजा घेतला जाणार आढावा!
दोन समाजामध्ये तेढ निर्माण होतील अशा जवळपास 12 हजार 800 पोस्ट मागील तीन महिन्यांत पोलिसांकडून सोशल मीडियावरून काढून टाकण्यात ( Mumbai Police action on controversy post ) आले आहेत. तसेच, या पोस्टमागे सूत्रधार कोण? याचा देखील शोध पोलिसांकडून करण्यात येत आहे.
पोलिसांच्या विशेष शाखेने जानेवारी महिन्यात 5 हजार 754, फेब्रुवारी 4 हजार 252, मार्च महिन्यात 3 हजार 958 पोस्ट सोशल मीडियावरून डिलीट केल्या. समाजात वाद निर्माण व्हावेत यासाठी काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक अशा पोस्ट केल्या जात आहेत. दररोज जवळपास 35 पोस्ट पोलिसांकडून डिलीट केले जातात. कोरोना काळापासून अशा पोस्टची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, राजकीय नेत्यांकडून केल्या गेलेल्या वक्तव्यानंतर अशा पोस्टचा सुळसुळाट तयार होतो. मुंबई पोलिसांकडून तयार करण्यात आलेल्या 'सोशल मीडिया लॅब'च्या ( Mumbai Police Social Media Lab ) माध्यमातून या पोस्ट डिलीट केल्या जातात.