ETV Bharat / city

पोलिसांनी माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे - किरीट सोमैया

किरीट सोमैया यांची मुलुंड पोलीस ठाण्यांमध्ये मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि एसीपी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. 19 सप्टेंबरला मुंबई पोलिसांनी मला बेकायदेशीररित्या घरामध्ये सहा तास स्थानबद्ध करून ठेवले होते, असा आरोप सोमैयांनी केला आहे. तसेच मुंबई पोलिसांनी 24 तासांच्या आत माझी माफी मागावी, अन्यथा इतर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे, असे सोमैया यांनी म्हटले आहे.

अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे - किरीट सोमय्या

author img

By

Published : Sep 22, 2021, 1:52 PM IST

Updated : Sep 24, 2021, 6:26 AM IST

मुंबई - भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया विरुद्ध राज्य सरकार हा वाद काही मिटण्याचे चिन्हे दिसत नाहीत. गेल्या आठवड्यात सोमैयांच्या कोल्हापूर भेटीच्याप्रकरणावरून मोठा पॉलिटिकल ड्रामा पाहायला मिळाला होता. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आक्रमक होत किरीट सोमैयांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले. त्यानंतर गणेश विसर्जनाच्या दिवशी सोमैया हे महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला निघाले असता, मुलुंड पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. याविरोधात किरीट सोमैया यांनी थेट आता पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

किरीट सोमय्या
किरीट सोमैया यांची मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि एसीपी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. 19 सप्टेंबरला मुंबई पोलिसांनी मला बेकायदेशीररित्या घरामध्ये सहा तास स्थानबद्ध करून ठेवले होते, असा आरोप सोमैयांनी केला आहे. तसेच मुंबई पोलिसांनी 24 तासांच्या आत माझी माफी मागावी, अन्यथा इतर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे, असे आवाहन सोमैया यांनी केले आहे. या प्रकरणी त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यानंतर किरीट सोमैया एमआरए पोलीस ठाण्याकडे रवाना झाले. आयपीसी कलम ३४०, ३४१, ३४२, १४९ अंतर्गत कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

ठाकरे सरकार का घाबरते -

हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोप प्रकरणी गणेश विसर्जनादिवशी कोल्हापूरला निघालेल्या किरीट सोमैया यांना पोलिसांनी कराड स्थानकातून रेल्वेतून खाली उतरवले. मात्र आता मंगळवारी सकाळी १० वा. पुन्हा मी कोल्हापूरला अंबा मातेचे दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याचे सोमैयांनी स्पष्ट केले आहे. तसेच मला ठाकरे सरकार एवढं घाबरते का? असा सवाल करत जर मी अलिबागला बंगले पाहायला गेलो तर हे काय करतील, असा टोला देखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

काय आहे प्रकरण ?

ग्राम विकास मंत्री मुश्रीफ यांच्यावर देखील आर्थिक गैरव्यवहार याचे गंभीर आरोप माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केले होते. याबाबत काही बैठकांसाठी सोमय्या कोल्हापुरात जाणार होते. मात्र त्यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी येथे येऊ नका अशी नोटीस दिली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी सोमैय्या यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा लावलेला आहे व त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. मात्र त्यानंतर झालेला हाय वोल्टेज ड्रामा करत सोमैयांनी सीएसटी स्थानकातून महालक्ष्मी ट्रेन पकडली आणि कोल्हापूरकडे ते मार्गस्थ झाले. तत्पूर्वी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने सोमैया यांनी बुधवारी तक्रार दाखल केली आहे.

Last Updated : Sep 24, 2021, 6:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.