ETV Bharat / city

दहिसर नाक्यातून 27 किलो चरस जप्त, मुंबई पोलिसांची कामगिरी - etv marathi

मुंबई पोलीस गुन्हे शाखा, नार्कोटिक सेल व यांच्याकडून अमली पदार्थांविरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यांनी केलेल्या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपीमध्ये २ पुरुष व २ महिला सहभाग दिसून आला आहे. हे सर्व आरोपी पवई परिसरात राहणारे आहेत.

चरस
चरस
author img

By

Published : Oct 26, 2021, 10:05 PM IST

Updated : Oct 26, 2021, 10:28 PM IST

मुंबई - शहरात मोठ्या प्रमाणात चरस-गांजाचे प्रमाण वाढ होत आहे. अशातच मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा ७ आणि ६ यांनी मुंबई प्रवेशद्वार असलेल्या दहिसर चेकनाका येथे २७ किलो चरस जप्त केले आहे. या प्रकरणात चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई पोलीस गुन्हे शाखा, नार्कोटिक सेल व यांच्याकडून अमली पदार्थांविरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यांनी केलेल्या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपीमध्ये २ पुरुष व २ महिला सहभाग दिसून आला आहे. हे सर्व आरोपी पवई परिसरात राहणारे आहेत. त्यांच्याकडून जप्त केलेल्या चरसची आंतरराष्ट्रीय किंमत १४ कोटी ४४ लाख रुपये आहे.

वाहनात लपविलेले चरस
वाहनात लपविलेले चरस

हेही वाचा-मलिकांनी "ते" निनावी पत्र एनसीबीच्या महासंचालकांना पाठवले

जम्मू काश्मीर, हिमाचल व नेपाळ या भागात चरसचे उत्पादन होत आहे. त्याठिकाणाहून आरोपी चरस विक्रीसाठी घेऊन येत होते. त्यासाठी विशेष गाडीचा वापरदेखील केला जात होता.

दहिसर नाक्यातून 27 किलो चरस जप्त

हेही वाचा-माझा नवरा खोटारडा नाही, रोज काय स्पष्टीकरण द्यायचे- क्रांती रेडकर

मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक-

ड्रग्ज तस्करीबाबत खुलासा करणारी पत्रकार परिषद गुन्हे शाखेचे डीसीपी दत्ता नलावडे यांच्याकडून घेण्यात येणार आहे. त्यामध्ये अधिक तपशीलासह माहिती देण्यात येईल असे कळते. मुंबईत सध्या एनसीबीच्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील कारवायांवर संशयाची सुई आलेली असतानाच दुसरीकडे मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. तब्बल १ महिन्यापासून या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या टीमने घेतलेली मेहनत अखेर यशस्वी ठरलेली आहे.

हेही वाचा- एसटीप्रवास दरवाढ : उद्या (बुधवारी) एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभर बेमुदत उपोषण

  • आर्यन खानला अटक, एनसीबी कोठडी -

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कॉर्डिया द क्रूझवर हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने कारवाई केली. यात १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), २१ ग्रॅम चरस, २२ एक्स्टसीच्या गोळ्या आणि १.३३ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा या आठ जणांना ताब्यात घेतले.

Last Updated : Oct 26, 2021, 10:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.