ETV Bharat / city

Saki Naka Rape Case: बलात्कार प्रकरणात एकच आरोपी, नराधमाला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी - साकीनाक बलात्कार प्रकरण

मुंबईतील साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना काल समोर आली होती. या संतापजनक घटनेतील पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणात एकच आरोपी सामील असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने आरोपीला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

sakinaka-rape-case
sakinaka-rape-case
author img

By

Published : Sep 11, 2021, 4:43 PM IST

Updated : Sep 11, 2021, 7:26 PM IST

मुंबई - मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली होती. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेवरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने आरोपीला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पत्रकार परिषदेत साकीनाक प्रकरणाची माहिती देताना आयुक्त हेमंत नगराळे

पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंनी सांगितले की, १० सप्टेंबरच्या रात्री ३ वाजून २० मिनिटाच्या दरम्यान साकीनाका येथील एका फॅक्टरीमधील वॉचमनने कंट्रोल रुमला फोन करून कळवले की, येथे एका महिलेला मारहाण सुरु आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांना कळवले. संबंधित अधिकारी दहा मिनिटाच्या आत तिथे पोहोचले. तिथे त्यांना एका उघड्या टेम्पोत एक महिला अत्यंत गंभीर अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. त्यावेळी पोलिसांनी विलंब न लावता टेम्पो सरळ राजावाडी रुग्णालयात नेला आणि तिला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्या महिलेवर त्वरीत उपचार सुरु केले. चौकीदाराच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.

हे ही वाचा - Mumbai Rape Case : साकीनाका बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशीची झाली पाहिजे - देवेंद्र फडणवीस

आरोपी कचरा वेचणाऱ्या गाडीवर चालक -

त्यानंतर पोलिसांनी तपास करत एका आरोपीला अटक केली. मोहन चौहान (जौनपूर, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. त्याला 21 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात एसीपी ज्योत्स्ना रासम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वात एक स्पेशल टीम बनवण्यात आली आहे. पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या गुन्ह्यात आता ३०२ कलमही लागू करण्यात आले आहे. आधी याप्रकरणात एक पेक्षा अधिक आरोपी सामील असण्याची शक्यता होती, परंतु आतापर्यंत झालेल्या तपासात एक आरोपी आतापर्यंत सापडला आहे. गुन्ह्याचे कारण आणि गुन्हा कसा घडला हे अजूनही गुपित आहे.
हा तपास लवकरात लवकर पूर्ण करून चार्जशीट दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा - Mumbai Nirbhaya Case : घटना निंदनीय, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

पोलिसांनी प्रसार माध्यमांना विनंती केली आहे, की कृपया असे कोणतेही फोटो, व्हिडिओ प्रसारित करू नका. जेणेकरून पोलीस तपास प्रभावित होईल. आरोपी कचरा वेचणाऱ्या टेम्पोवर ड्रायव्हर आहे. तो रस्त्यावरच रहात होता. त्याच परिसरात आरोपीचे नातेवाईक राहत होते. नातेवाईकांनी त्याला घराबाहेर काढले आहे.

Last Updated : Sep 11, 2021, 7:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.