ETV Bharat / city

मुंबई पोलीस यंत्रणा नेहमीच हाय अलर्टवर, अशी आहे सुरक्षा व्यवस्था..

देशातील आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर नेहमीच दहशतवादी हल्ल्यांच्या निशाण्यावर सतत राहिले आहे. याला अनुसरून मुंबईमध्ये पोलीस यंत्रणा नेहमीच हाय अलर्टवर काम करत असते. अशी आहे सुरक्षा व्यवस्था..

मुंबई पोलीस
मुंबई पोलीस
author img

By

Published : Nov 5, 2020, 12:48 PM IST

मुंबई - देशातील आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर नेहमीच दहशतवादी हल्ल्यांच्या निशाण्यावर सतत राहिले आहे. याला अनुसरून मुंबईमध्ये पोलीस यंत्रणा नेहमीच हाय अलर्टवर काम करत असते. शहराबद्दल बोलायचं झालं तर मुंबईची लोकसंख्या जवळपास 1 कोटी 84 लाखांच्या आसपास आहे. मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी आजच्या घडीला 42 हजार पोलिसांचा फौजफाटा उपलब्ध आहे.

मुंबई पोलीस यंत्रणा नेहमीच हाय अलर्टवर

5500 सीसीटीव्हींचे जाळे -

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईच्या सुरक्षेसाठी आमुलाग्र बदल करण्यात आलेले आहेत. मुंबईतल्या कुठल्याही भागात जर एखादी संशयास्पद हालचाली होत असेल किंवा एखादा गुन्हा घडत असेल तर, त्यावर अंकुश ठेवण्यासाठी, आरोपींचा शोध घेण्यासाठी शहरात 5 हजार 500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आलेले आहे.

26/11 च्या हल्यानंतर पोलीस खात्यात मोठे बदल

या शहराची सुरक्षा ठेवण्यासाठी मुंबई पोलीस नेहमी डोळ्यात तेल घालून काम करत असतात. मुंबईमध्ये सध्या 94 पोलीस ठाणी असून 102 ट्रॅफिक पोलिसांच्या चौक्या मुंबई शहरात अस्तित्वात आहेत. मुंबई पोलिसांकडे सध्या 3 हजार 505 हॅच बॅक, एसयूव्ही व मोटरसायकल्स अशी वाहने असून मुंबईला लागलेल्या समुद्र किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी 32 स्पीड गनबोट मुंबई पोलिसांकडे सध्या उपलब्ध आहेत. सध्याच्या परिस्थितीत मुंबई पोलिसांकडे 5 हेलिकॉप्टरचा ताफा असून बॉम्ब शोधक व नाशक पथकात 52 श्वान मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहेत.

26/11 च्या हल्ल्यानंतर मुंबई शहराच्या सुरक्षेत आमूलाग्र बदल करण्यात आलेले असून मुंबई पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रेही पुरवण्यात आलेली आहेत. सदर मुंबई पोलीस खात्यामध्ये लोकल पोलीस, स्पेशल युनिट सर्विस, गुन्हे शाखा, सायबर सेल, कमांडो फोर्स, डिटेक्शन युनिट, दहशतवादविरोधी पथक, ट्रॅफिक पोलीस, सोशल सर्व्हिस सेल, नारकोटिक्स सेल, वायरलेस सेल, स्पेशल ब्रांच, इंटेलिजन्स युनिट, इकॉनोमिक ऑफेन्स विंग क्विक रिस्पॉन्स टीम, फोर्स वनसारखी पोलीस सुरक्षा व्यवस्था अस्तित्वात आहे.

वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई

मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे येथे नेहमी सतर्कता बाळगली जाते. प्रतिबंधात्मक कारवाईदरम्यान मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संचार बंदी जाहीर केली जाते. काही विशिष्ट ठिकाणी यात खास करून बीएआरसी, एचपी रिफायनरी, बीपी रिफायनरी, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मंत्रालय व इतर संवेदनशील परिसरामध्ये ड्रोनसारख्या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.