मुंबई - मुंबईत गेल्या काही दिवसांपासून धमकीचे मेसेजेस आणि धमकीचे कॉल प्राप्त Mumbai Threat Message Call होत असून, मुंबई पोलीस सतर्क झाले Mumbai Police High Alert आहेत. तसेच सणासुदीचे दिवस काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव Mumbai Ganeshotsav Police Security या पार्श्वभूमीवर मुंबईत ठीकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त बाळसिंग रजपूत यांनी 'ई टीवी भारत'शी बोलताना दिली.
गेल्या काही दिवसांपूर्वी अलिबाग येथील हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर सापडलेल्या संशयित बोट आणि बोटीत सापडलेल्या तीन एके 47 रायफल्स यामुळे सबंध राज्यात खळबळ माजली. त्यानंतर रिलायन्स रुग्णालयात आलेला मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल आणि मुंबई वाहतूक पोलीस विभागाला व्हाट्सअपद्वारे प्राप्त झालेला धमकीचा मेसेज या सर्व गोष्टी पाहता मुंबईसह महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत.
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया मंत्रालय विधान भवन अशा संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा कडे कोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच समुद्रकिनारी आणि मुंबई शहरातील अति गर्दीचे ठिकाण आणि संवेदनशील अतिसंवेदनशील परिसरात मुंबई पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवले असून पोलिसांच्या बंदोबस्त देखील वाढवलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे पाच दिवसांवर सर्वात मोठा राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव हा सण आल्याने मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. त्याबाबत मुंबई पोलिसांचे नियोजन सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली तसेच मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजा येथे संपूर्ण देशातून भाविकांची होणारी प्रचंड गर्दी पाहता तेथे कोणतीही समाज विघातक घटना घडू नये, यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक आणि केंद्र सरकारची सुरक्षा यंत्रणा देखील कार्यरत असते.