ETV Bharat / city

e-cigarette sellers: मुंबई पोलिसांची ई सिगरेट विक्रेत्यांवर कारवाई; 14 लाखांचा माल जप्त

author img

By

Published : Jul 15, 2022, 10:30 PM IST

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून मुंबईमध्ये बेकायदेशीर रित्या विकले जाणारे विदेशी कंपनीचे ई सिगारेट विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात पोलिसांकडून आज शुक्रवार (दि. 15 जुलै)रोजी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 14 लाख रुपयांचे ई सिगारेट जप्त करण्यात आले आहे. ( e-cigarette sellers ) दरम्यान, 11 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

मुंबई - विदेशी कंपन्यांकडून ई-सिगारेट ही परवाना नसलेली उत्पादने भारतात बेकायदेशीरपणे आयात करून त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. लोकांना धुम्रपान सोडण्यास मदत करतील या नावाखाली ही उत्पादने विकली जातात. ( Mumbai police ) परिणामी तरुणांमध्ये ई-सिगारेट वापरण्याचा कल झपाट्याने वाढत आहे. परंतु त्याच्या वापरामुळे प्रत्यक्षात फायद्या पेक्षा तोटाच जास्त आहे.

पोलीसांची 12 वेगवेगळी पथके तयार - मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या सी. बी. कंट्रोल कक्षाकडून मुंबई मधील ई-सिगारेट उत्पादनांची विक्री करणाऱ्या दुकानदारावे कारवाई केली. मुंबईमधील विविध ठिकाणी ई सिगारेटचा साठा व विक्री केली जात असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली होती. प्राप्त माहितीची शहानिशा करून पुढील तपासासाठी पोलीसांची 12 वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.

14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त - मुंबईत पथकांनी पाली नाका, खार, लोखंडवाला अंधेरी, मालाड येथे 11 दुकाने व ऑनलाईन पद्धतीने विक्री करणारे असे 12 ठिकाणांवर छापा कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या कारवाई दरम्यान दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक सिगारेट, रिफीलिंग विविध मॉडल्स व हुक्क्या करीता वापरण्यात येणारी सुगंधीत तंबाखू 2030 इलेक्ट्रॉनिक सिगारेट, हुक्का फ्लेव्हर चे 963 बॉक्स मधील, ई-सिगारेट करीता वापरण्यात येणारे रिफीलींग द्रावणाचे 53 बॉटल्स असा 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व 11 इसमांना अटक केली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला असून या संदर्भात पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा - Voter List Linked Aadhar Card : देशातील मतदार याद्या 'आधार'शी जोडणार, निवडणूक आयोगाचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.