मुंबई - मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai CP Sanjay Pandey) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सिल्व्हर ओक येथे भेट घेतली. संजय पांडे यांनी सोमवारी मुंबई पोलीस आयुक्त पदभार स्वीकारल्यानंतर आज शरद पवार यांची भेट घेतली आहे.
संजय पांडे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त -
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय पांडे (Sanjay Pandey) यांची मुंबईच्या पोलीस आयु्क्तपदी नियुक्ती करणयात आली आहे. तर मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आहे. आता नगराळे हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहतील. संजय पांडे यांनी यापूर्वी राज्याच्या पोलीस महासंचालकपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.